शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ७१२ गावे दुष्काळसदृश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:09 IST

जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ७१२ गावांचा समावेश असून, दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.

अकोला : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून मंगळवारी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ७१२ गावांचा समावेश असून, दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, उपाययोजनांना सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या या पाच तालुक्यांत ७२१ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांतील ७१२ गावांमध्ये शासनाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाच तालुक्यांत अशी आहेत गावे!तालुका             गावेअकोला           १८२तेल्हारा             १०६बाळापूर           १०३मूर्तिजापूर          १६४बार्शीटाकळी       १५७..................................एकूण               ७१२‘या’ उपाययोजना होणार लागू!दुष्काळसदृश गावांसाठी जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज देयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.सत्यमापनाचा अहवाल पाठविला शासनाकडे!जिल्ह्यातील दुष्काळसदृश पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल व कृषी विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून, दुष्काळसदृश परिस्थितीच्या सत्यमापनाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी दुपारी शासनाकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती, पिकांचे उत्पादन, पिकांचे नुकसान व इतर प्रकारच्या माहितीचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला