शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीचे ७० हजार डोस अकोल्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 10:56 IST

Corona Vaccine News मोहिमेसाठी अकोला मंडळाला कोविड लसीचे ७० हजार डोस मिळाले आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन लसीकरणाच्या तयारीला लागले आहे.लसी ठेवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. लसीचा पहिला डोस १६ जानेवारी रोजी दिला जाणार आहे.

अकोला : राज्यासह जिल्ह्यातही दोन दिवसांनी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेसाठी अकोला मंडळाला कोविड लसीचे ७० हजार डोस मिळणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी लसीचे डोस अकोल्यात दाखल झाले असून, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग तयारीला लागले आहे.

कोरोनाचे थैमान सुरू असतानाच कोरोनाच्या लसीकरणामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. गत आठवड्यात जिल्ह्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम झाल्याने, अनेकांचे लक्ष कोविड लसीकरणाकडे लागून आहे. दरम्यान, १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यातील लसीकरण होणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन लसीकरणाच्या तयारीला लागले आहे. याच दरम्यान बुधवारी सकाळी पुण्याहून जवळपास ७० हजार कोविड लसीचे डोस  अकोल्यात दाखल झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या लसी ठेवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक डोस हे बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांना मिळणार असल्याची माहिती आहे.

 

महिनाभरानंतर दुसरा डोस

कोविडची लस दोन डोसमध्ये दिली जाणार असून लसीचा पहिला डोस १६ जानेवारी रोजी दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यासाठी बुधवारी नऊ हजार डोस प्राप्त झाले आहेत. लसीचा दुसरा डोस महिनाभरानंतर प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत मिळाली आहे.

 

अकोल्यात ७,७८३ लाभार्थ्यांची नोंद

 

पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने लसीकरणासाठी महिनाभरापासून लाभार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. यामध्ये आतापर्यंत ७,७८३ पेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

 

जिल्हानिहाय उपलब्ध लस

जिल्हा - लसीचा साठा

 

अकोला - ९०००

अमरावती - १७०००

बुलडाणा - १९०००

वाशिम - ६५००

यवतमाळ - १८५००

------------------------

 

एकूण - ७०, ०००

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला