शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तूर, हरभरा डाळीचा सात हजार क्विंटल साठा उपलब्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:37 IST

लवकरच जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव दुकानांमधून मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.

अकोला : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी प्रतिमहा प्रतिशिधापत्रिका एक किलो प्रमाणे तूर किंवा हरभरा यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी ६ हजार ९२० क्विंटल तूर व हरभरा डाळीचा साठा उपलब्ध झाला आहे. लवकरच जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्तभाव दुकानांमधून मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीला पाच किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. यासोबतच प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा अतिशिधापत्रिका एक किलो तूर किंवा हरभरा यापैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना गाडीचे मोफत वितरण करण्यासाठी ७ जूनपर्यंत ६ हजार ९२० क्विंटल हरभरा व तूर डाळीचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यातील मोफत डाळीचे वितरण जिल्हा पुरवठा विभागामार्फत लवकरच जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून सुरू करण्यात येणार आहे.उपलब्ध झालेलाअसा आहे डाळीचा साठा !हरभरा डाळ : ५५५० क्विंटलतूर डाळ : १३७० क्विंटलदोन महिन्यातील तूर डाळीचा साठा प्रलंबित !जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ५ हजार ५५० क्विंटल हरभरा डाळीचा साठा उपलब्ध झाला असला तरी , एप्रिल महिन्यातील १ हजार ३७० क्विंटल तूर डाळीचा साठा उपलब्ध झाला असून , उर्वरित मे व जून या दोन महिन्यांचा तूर डाळीचा साठा प्राप्त होणे अद्याप प्रलंबित आहे.जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी आतापर्यंत ६ हजार ९२० क्विंटल हरभरा व तूर डाळीचा साठा उपलब्ध झाला असून, लवकरच रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना मोफत डाळीचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.-बी.यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोला