शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

रस्ते कामांसाठी ७0 ग्रामपंचायतींशी करारनामे!

By admin | Updated: March 28, 2016 01:36 IST

अकोला जिल्हय़ातील १९४ कामांची अंदाजपत्रके तयार.

संतोष येलकर / अकोलाजिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हय़ातील ग्रामीण भागात पाच कोटींच्या निधीतून १९४ रस्ते कामांची अंदाजपत्रके अखेर तयार करण्यात आली असून, त्यापैकी ७0 रस्त्यांच्या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायतींशी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करारनामे करण्यात आले आहेत.जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हय़ातील ग्रामीण भागात अंतर्गत रस्ते कामांसाठी पाच कोटींच्या निधीतून, जिल्हा परिषद सर्कलनिहाय कामांचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कारभारात आधीच रस्ते कामांचे नियोजन करण्यास विलंब झाला असताना, नियोजनानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभाग स्तरावर रस्ते कामांची अंदाजपत्रके तयार करणे व प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया रखडली होती. अखेर गत पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १९४ रस्त्यांच्या कामांची तयार करण्यात आलेली अंदाजपत्रके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्राप्त झाली. त्यानंतर १९४ रस्ते कामांपैकी ७0 रस्ते कामांसाठी संबंधित ग्रामपंचायतीसोबत जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करारनामे करण्यात आले. तसेच १५ रस्ते कामांचे कार्यारंभ आदेशही (वर्क ऑर्डर) देण्यात आले असून, करारनामे झालेल्या इतर कामांच्या ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. करारनामे करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमार्फत रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. रखडलेली कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली असून, कामांचे करारनामे व ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या रस्ते कामांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.