शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅफलाइन’ पीक विम्याचा ६५९१ शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:24 IST

‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचा लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

- संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत दीड वर्षापूर्वी ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा रकमेचा लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१७ या वर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढण्यासाठी ‘आॅनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर, शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेतकºयांचे ‘आॅफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकºयांनी पीक विम्यासाठी सादर केलेले ‘आॅफलाइन’ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात आले होते. आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गत जुलैमध्ये शासनाकडे सादर करण्यात आली होती. तसेच पीक विम्याचा लाभ देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला होता. ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केल्यानंतर दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला; मात्र पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने, पीक विम्याचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात असताना, अखेर ‘आॅफलाइन’ अर्ज सादर केलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी ६९ कोटी ४८ लाख रुपये पीक विम्याची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आल्याचा आदेश कृषी आयुक्तालयामार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला १५ फेबु्रवारी रोजी प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील आॅफलाइन अर्ज केलेल्या शेतकºयांसाठी मंजूर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.तालुका               शेतकरीअकोला              ११७३अकोट                १६५९तेल्हारा                ७६०बाळापूर               ६६९पातूर                 ११४३बार्शीटाकळी         ७४६...............................................एकूण                     ६५९११० कोटींची रक्कम मिळणार?पीक विमा योजनेंतर्गत आॅफलाइन अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार ५९१ शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी १० कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी आयुक्तालयासह शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आॅफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांसाठी पीक विम्याची रक्कम प्राप्त होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमा