शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

६४७ जोडप्यांची दुभंगलेली मने पुन्हा जुळली!

By admin | Updated: April 1, 2017 02:59 IST

महिला सुरक्षा कक्षाचे यश; घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत आलेला संसार फुलला!

नितीन गव्हाळेअकोला, दि. ३१- महिलांवर होणार्‍या अत्याचारामध्ये अकोला जिल्हा आघाडीवर आहे. जिल्हय़ातच नव्हे तर शहरात दररोज कुठे ना कुठे महिला हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, मानसिक व शारीरिक छळाच्या बळी ठरताहेत. राज्य शासनाने पोलिसांच्या मदतीने सुरू केलेल्या महिला सुरक्षा विशेष कक्षामध्ये दररोज पती, पत्नीतील वादाच्या तक्रारी सातत्याने येतात. या तक्रारींचा निपटारा करून पती, पत्नीतील वाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महिला तक्रार निवारण विशेष कक्षाने गेल्या तीन वर्षांमध्ये मोडणारे ६४७ संसार जुळविण्यात यश मिळवले आणि आज हे संसार आनंदाने नांदताहेत.जिल्हय़ात महिला अत्याचाराच्या घटना दररोज घडतात. परिणामी, त्यात महिलांचा बळी जातो. वादविवाद होतात. घटस्फोट घेण्यापर्यंत मजल जाते. त्यात मुलाबाळांची आबाळ होते. महिलांवरील वाढत्या अत्याचाराला प्रतिबंध घालता यावा, पती-पत्नीत तडजोड व्हावी, त्यांना मार्गदर्शन मिळून त्यांच्यातील वाद संपुष्टात यावे आणि पुन्हा त्यांच्या संसाराची गाडी रुळावर यावी, या दृष्टिकोनातून राज्य शासनाने १ मे १९९७ पासून महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केला. अकोल्यातही हा कक्ष सुरू आहे. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालय परिसरात हा कक्ष आज उभा आहे. या कक्षाच्या प्रमुख म्हणून सहायक पोलीस निरीक्षक वैशाली आढाव या पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात काम पाहतात. तसेच पती, पत्नींच्या तक्रारीनुसार दोघांनाही बोलावून राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे, सेवानवृत्त न्यायाधीश विमल लोहिया, प्रा. निशा बाहेकर, अख्तर बेगम, शहनाज आदी समुपदेशन करतात. या कक्षाच्या तीन वर्षांंच्या कामगिरीचा आढावा घेतला असता, अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या. गेल्या तीन वर्षांमध्ये या कक्षामध्ये पती-पत्नीतील वादाच्या १७५८ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी ६४७ तक्रारींचा निपटारा करून पती-पत्नीमध्ये तडजोड घडविण्यात आली. २९३ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले. तीन वर्षांमध्ये कक्षातील महिला कर्मचारी, अधिकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक जोडपी सुखी संसार करीत आहेत. ही बाब समाजासाठी सुचिन्हे निर्माण करणारी आहे. पोलिसांच्या माध्यमातून महिला सुरक्षा कक्षाकडे आलेल्या तक्रारींनुसार आम्ही पती, पत्नीला बोलावून त्यांचे समुपदेशन करतो. दोघांच्या भांडणामुळे दोन्ही कुटुंबासह मुलाबाळांवर काय परिणाम होतो, याची जाणीव करून देतो; परंतु काही जोडपी समजूत काढल्यानंतरही काडीमोड घेतात. त्यांचे प्रकरण आम्ही पोलीस ठाण्याकडे पाठवितो. - वैशाली आढाव, सहायक पोलीस निरीक्षकप्रमुख, महिला तक्रार निवारण कक्षमहिला तक्रार निवारण कक्षात आलेल्या तक्रारीवर्ष             तक्रारी                आपसात        गुन्हे दाखल २0१४            ५५0                      २२८                ८८ २0१५            ५५६                    २५0                 १२२२0१६            ५८७                    १३९                   ६४२0१७             ६५                       ३0                   १९