अकोला : स्थानिक पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये दीक्षांत संचलनाचा नेत्रदीपक सोहळा सोमवारी सकाळी पार पडला. यावेळी ६४१ प्रशिक्षणार्थी पोलिस शिपाई पासआउट होऊन केंद्राबाहेर पडले. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम् यांची दीक्षांत संचलन सोहळय़ाला विशेष उपस्थिती होती. प्रारंभी अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम् यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायांनी शिस्तबद्ध कवायत सादर केली. पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डी. एस. महाजन यांनी अहवाल वाचन केले तसेच प्रशिक्षण केंद्रातील उपक्रमांची माहिती दिली. पासआउट झालेल्या पोलिस शिपायांनी कर्तव्य बजावताना समाजाला सौजन्याची वागणूक देऊन दुर्बल घटक, महिला, मुलांना मदत करावी आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. डॉ. के. व्यंकटेशम् यांनी पोलिस प्रशिक्षणार्थींनी कर्तव्याची जाणीव ठेवून सर्मपणाच्या भावनेतून कार्य करावे आणि ह्यसद्रक्षणाय, खलनिग्रणायह्ण या ब्रीदाचा विसर पडू देऊ नये. पोलिस म्हणून समाज आमच्याकडे मोठय़ा आशेने पाहतो. त्यांच्या आशेला जागून, विश्वास संपादन करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रातील ६४१ प्रशिक्षणार्थी शिपाई ‘पासआऊट’
By admin | Updated: October 21, 2014 00:14 IST