शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून ६४ गावांना मिळाले नाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:41 IST

अकोला : ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा गत महिनाभरापासून बंद असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुढारी आणि अधिकारी व्यस्त असल्याने, ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडण्यात येते; परंतु पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाणी पुरवठा करण्यासाठी खांबोरा येथील पाणी उचल करण्याचे पंप गत २४ मार्च रोजी नादुरस्त झाल्याने, योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना गत महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही. जिवाची लाही-लाही करणाºया उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, पुढारी आणि प्रशासनातील संबंधित अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ६४ खेड्यातील पाणी प्रश्नाकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.पाणी विकत घेऊन भागविली जाते तहान !खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद असल्याने, योजनेंतर्गत गावातील ग्रामस्थांना १०० रुपये प्रती कोठी प्रमाणे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.गरिबांची ‘झिऱ्यां’वर धाव !महिनाभरापासून गावातील नळांना पाणी आले नसल्याने, ६४ गावांमधील काही ग्रामस्थ पाणी विकत घेऊन तहान भागवित आहेत; मात्र ज्यांना पाणी विकत घेऊन तहान भागविणे परवडणारे नाही, अशा गरीब ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी नदी-नाल्यातील ‘झिºयां’वर धाव घ्यावी लागत आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिला-पुरुषांना दोन-तीन तास झिºयांवर ताटकळत बसावे लागत आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांना महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळाले नाही, त्यामुळे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे., तर पाणी विकत घेणे ज्यांना शक्य नाही, अशा गरीब ग्रामस्थांना झिºयातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ६४ गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.-दिलीप मोहोडसरपंच, आखतवाडा तथाअध्यक्ष, बारुला विभाग कृती समिती.पाणी उचल करण्याचे पंप नादुरुस्त झाल्याने गत २४ मार्चपासून खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. पंप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारपासून गावांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.-अनिल चव्हाणशाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई