शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

६४ खेडी योजनाही खासगी तत्त्वावर!

By admin | Updated: March 27, 2017 03:03 IST

१.७३ लाखांसाठी रखडली तांत्रिक मान्यता.

अकोला, दि. २६- अकोला तालुक्यातील विशेषत: खारपाणपट्टय़ात असलेल्या गावांना पाणीपुरवठा करणारी ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला अखेरची घरघर लागली आहे. कर्मचार्‍यांअभावी एकदमच बंद पडण्यापूर्वी ती कंत्राटावर चालवण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तपासणी शुल्काची रक्कम १ लाख ७३ हजार रुपये न दिल्याने तांत्रिक मान्यता रखडल्याची माहिती आहे. खारपाणपट्टय़ातील ५९ गावांसह ६४ खेड्यांना पुरवठा करणारी योजना आता कर्मचार्‍यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याचे कारणही तसेच आहे. जिल्हा परिषदेने २00८ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून हस्तांतरित करून घेतली. त्यावेळी योजना चालवण्यासाठी ९५ कर्मचारी होते. आता त्यांची संख्या ३४ वर आली आहे. त्यापैकी काही कर्मचारी वर्षाअखेर नवृत्त होणार आहेत. त्यातच शासनाने नवीन कर्मचारी भरतीला बंदी घातली आहे. ज्या संस्थांमध्ये पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी कर्मचारी नसतील, त्यांच्या योजना कंत्राटी तत्त्वावर चालवण्याचाही पर्याय दिला. त्यासाठी जलव्यवस्थापन समितीच्या सभेची मंजुरी घ्यावी लागते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बैठकीत योजना खासगी कंत्राटावर देण्याचा पर्याय निवडण्यात आला. त्यासाठी सरपंचांनाही सभेत बोलावण्यात आले होते. त्यांनी महिनाभर वेळ मागितला होता. मात्र, नंतर वसुलीमध्ये प्रगती न झाल्याने योजना कंत्राटावर देण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे. त्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे १ कोटी ८0 लाख रुपयांचे अंदाजपत्रक पाणीपुरवठा विभागाने तयार केले. त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी त्यांच्याकडे पाठवण्यात आले. मात्र, एक टक्का तपासणी शुल्काची रक्कम म्हणून १ लाख ७३ हजार ९९0 रुपये न दिल्याने तांत्रिक मान्यता रखडली आहे.