शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीतून ६२ जणांना विषबाधा; एकाचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 11:00 IST

४७ वर्षीय शेतमजुराचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गत दीड महिन्यात सर्वोपचार रुग्णालयात कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झालेल्या ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. फवारणीतून विषबाधेचे प्रमाण वाढत आहे. अशातच बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथील ४७ वर्षीय शेतमजुराचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यात कपाशीसह इतर पिकांंवर कीटकनाशक फवारणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे फवारणीतून विषबाधेचे प्रमाणही वाढले आहे.सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये सरासरी चार ते पाच रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले असतात. फवारणीतून विषबाधा झालेल्या ६२ जणांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.यामध्ये अकोल्यासह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील गोळेगाव (ता.जळगाव जामोद) येथील ३१ वर्षीय युवा शेतकºयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णाने विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत असून, त्या रुग्णाचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे वैद्यकीय सूत्रांचे मत आहे. पश्चिम विदर्भात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातून विषबाधा झालेले रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होतात.सद्यस्थितीत सौम्य आणि मध्यम प्रभावातील रुग्ण दाखल होतात. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती सुरक्षात्मक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

दोघांची प्रकृती चिंताजनकसर्वोपचार रुग्णालयात दाखल फवारणीतून विषबाधेच्या रुग्णांमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या दोन्ही रुग्णांना ‘आयसीयु’मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

विषबाधेचे इतरही रुग्ण!सध्या फवारणीतून विषबाधा झालेले चार ते पाच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. याच प्रमाणात विषप्राशन करणाºया रुग्णांचाही समावेश आहे. म्हणजेच सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला सरासरी आठ ते दहा रुग्ण हे विषबाधेचे दाखल होतात.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती