शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'मजीप्रा'चे २८ जिल्हा परिषदांसह ग्रामपंचायतींकडे ६०६ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 12:39 IST

अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांची पाणीपट्टी, देखभाल दुरुस्ती खर्चासोबतच दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याजापोटी राज्यातील २८ जिल्हा परिषदांसह ग्रामपंचायतींकडे ६०६ कोटी रुपये थकीत आहेत.

-  सदानंद सिरसाटअकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांची पाणीपट्टी, देखभाल दुरुस्ती खर्चासोबतच दिलेले कर्ज आणि त्यावरील व्याजापोटी राज्यातील २८ जिल्हा परिषदांसह ग्रामपंचायतींकडे ६०६ कोटी रुपये थकीत आहेत. ती रक्कम मजीप्राला मिळावी, यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या सचिवांच्या समितीने जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींकडे आता तगादा लावला आहे.राज्यातील अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा खर्च जिल्हा परिषदांकडून केला जातो. त्या योजना चालवणे, देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे. त्यामुळे पाणीपट्टीसह योजना चालवण्याचा खर्च मजिप्राला द्यावा लागतो; मात्र योजनांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीपट्टी वसुलीचे अल्प प्रमाण, त्यातच जिल्हा परिषदांची कर्ज देण्यास टाळाटाळ या मुद्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शेकडो कोटी रुपये थकबाकी झाली आहे. त्यातच काही योजनांसाठी मजीप्राने कर्जही दिले आहे. कर्जाची रक्कम, त्यावरील व्याज, पाणीपट्टीची रक्कम मिळून राज्यातील २८ जिल्हा परिषदांसह त्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ६०६ कोटी ६६ लाख रुपये थकीत असल्याची आकडेवारी ३१ मार्च २०१८ रोजी पुढे आली आहे. ती वसूल करण्यासाठी शासनाने सचिवस्तरीय समिती गठीत केली. त्या समितीची बैठक आॅक्टोबर २०१८ मध्ये पार पडली. त्यावेळी जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतींकडून मजीप्राला घेणे असलेल्या मुद्दलाची रक्कम २०७ कोटी ७ लाख ३० हजार एवढी आहे. तर त्यावरील थकबाकीचा विलंब आकाराची रक्कम ३९९ कोटी ५९ लाख ४५ हजार ही मिळून ६०६ कोटी ६६ लाख एवढी पुढे आली. ही रक्कम वसुलीसाठी २८ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देण्यात आले. त्यामध्ये रकमेचा ताळमेळ घेऊन थकीत रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तातडीने अदा करण्याचे बजावण्यात आले आहे.- थकबाकी असलेल्या जिल्हा परिषद, त्यातील ग्रामपंचायतीठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, धुळे, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी