शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फासेपारधी कुटुंबाची गर्भवती, चिमुकल्यांसह ६०० कि.मी.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:16 IST

दररोज ३० ते ४० किलोमीटर पायपीट करीत मजल दरमजल करीत त्यांनी १६ दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी सायंकाळी निंबा फाटा गाठले.

- विलास बोरचाटे लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा फाटा : अकोट तालुक्यातील अंबोडा येथील फासेपारधी समाजाचे भोसले व पवार कुटुंब उदरनिर्वाहाकरिता नाशिक येथे वास्तव्यास होते. बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या या कुटुंबावर लॉकडाउनमुळे उपासमारीची पाळी आली. त्यामुळे घर गाठण्यासाठी सुरू केलेला ६०० कि.मी.चा पायी प्रवास पाय रक्ताळले तरी संपत नव्हता. २ मे रोजी सायंकाळी १६ दिवस प्रवासानंतर त्यांनी निंबा फाटा गाठले; मात्र आता निंबा फाटा येथून आंबोडा येथील घर ४० किमीवरच असल्याची माहिती मिळताच या कुटुंबाचे चेहºयावर आपण फार मोठा पल्ला गाठल्याचा आनंद दिसत होता. भुकेची व्याकुळता होती.कोरोनाच्या महामारीच्या पृष्ठभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन घोषित झाले आणि सर्व उद्योगधंदे ठप्प झाले.स्थलांतरित मोलमजुरी करून पोट भरणाºया मजुरांवर तर आभाळच कोसळले. अशीच परिस्थिती नाशिक येथे बांधकाम मजूर म्हणून काम करणाºया अकोट तालुक्यातील आंबोडा येथील दीपक भोसले (३५) त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी शिवगंगा भोसले, भाऊ बिरजू भोसले, मुली सारिका पाच वर्षे, दिया तीन वर्षे व मुलगा दीपक एक वर्ष यासह पवार कुटुंबातील वदळबाई रतन पवार (५५), आकाश पवार, पत्नी हलवा आकाश पवार, मुलगा रोहित वय ८, मुलगी शिक्षा ४, मुलगी मिक्षा २ वर्षे अशा १२ जणांचा गरीब परिवार मोलमजुरी करून आपले पोट भरायचा.या कुटुंबाला पोसणाºया दीपक, बिरजू व आकाश यांचे लॉकडाउनमुळे हातचे काम गेले. जवळ पैसा नाही, अन्नधान्य नाही. महिना उलटूनही लॉकडाउन संपत नसल्यामुळे या दोन्ही परिवाराने नाइलाजास्तव नाशिक येथून अकोट तालुक्यातील आंबोडा गाव गाठण्याचा निश्चय केला आणि सुरू झाला ६०० कि.मी.चा पायी प्रवास.चिमुकली मुले म्हातारी आई व गर्भवती पत्नीसह दररोज ३० ते ४० किलोमीटर पायपीट करीत मजल दरमजल करीत त्यांनी १६ दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी सायंकाळी निंबा फाटा गाठले. येथून आंबोडा ४० कि.मी. असल्याचे कळताच आपण घराजवळ आल्याचे व फार मोठा पल्ला गाठल्याचा आनंद झाला होता; मात्र उपाशीपोटी असल्यामुळे त्यांनी निंबा फाटा येथे विसावा घेतला.

दानशूरांची मदतया भुकेलेल्या कुटुंबाची निंबा येथील गोपालशेट चितलांगे यांनी जेवणाची व्यवस्था केली, तर सायंकाळची चूल पेटावी म्हणून कवठा येथील स्वस्त धान्य दुकानदार पुरुषोत्तम घ्यारे यांनी त्यांना २० किलो तांदूळ मोफत दिले. लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचा स्वगृही परतण्याकरिता शासनाने निर्णय घेतला आहे; मात्र आॅनलाइन अर्जाच्या माहितीअभावी भोसले व पवार यांच्यासारखी अनेक गरीब कुटुंबे आजही राष्ट्रीय महामार्गावर घर गाठण्यासाठी पायपीट करीत असल्याचे भयानक वास्तवही नाकारता येणार नाही.

टॅग्स :Akolaअकोला