शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

६0 गॅस सिलिंडर प्रकरणात केवळ चौकशीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:18 IST

अकोला: पोलीस पथक आणि पुरवठा विभागाने गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गीता नगरातील क ॅटरर्स व्यावसायिक संजय सिसोदिया याच्या गोदामात तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले; परंतु हे जप्त करण्यात आले नाहीत. व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण पुरवठा विभागाकडे सुपूर्द केले.

अकोला: पोलीस पथक आणि पुरवठा विभागाने गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गीता नगरातील क ॅटरर्स व्यावसायिक संजय सिसोदिया याच्या गोदामात तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले; परंतु हे जप्त करण्यात आले नाहीत. व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण पुरवठा विभागाकडे सुपूर्द केले. या गॅस सिलिंडर साठ्याची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे; परंतु एवढ्या मोठा सिलिंडरचा साठा ठेवण्याची परवानगी या व्यावसायिकाला दिली कोणी, ६0 गॅस सिलिंडर वापरण्याची परवानगी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहर पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकासह पुरवठा विभागाने गीता नगरातील संजय सिसोदिया याच्या गोदामात छापा टाकला असता, त्याच्या गोदामात एक नव्हे, तर दोन कंपनीचे तब्बल ६0 गॅस सिलिंडर आढळून आले. सिलिंडर घरगुती नसून, व्यावसायिक असल्यामुळे पोलीस विभागाने कारवाईचे अधिकार पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना दिले; परंतु पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी गॅस सिलिंडर जप्त करणे अपेक्षित असतानाही ते जप्त केले नाहीत. कारवाईदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर बाळगण्याची परवानगी त्याच्याकडे आहे का, गोदामात अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसतानाही एवढा मोठा सिलिंडर साठा ठेवला कसा, या प्रश्नांची उकलसुद्धा झाली नाही. उलट पुरवठा विभागाने दोन्ही गॅस कंपनीच्या अधिकाºयांना पत्र पाठवून खुलासा मागविला आहे. पुरवठादाराला एखाद्या व्यावसायिकाला एवढे गॅस सिलिंडर उपलब्ध करून देता येऊ शकतात. किती सिलिंडर ठेवतात येतात, आदी प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच आहेत. गॅस कंपन्यांकडून खुलासा आल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू, असे पुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.गुरुवारी केलेल्या कारवाईदरम्यान गोदामात ६0 गॅस सिलिंडर आढळून आलेत. हे व्यावसायिक सिलिंडर असल्यामुळे, एवढे सिलिंडर बाळगता येतात का, संबंधित व्यावसायिकाचा किती सिलिंडरचा कोटा ठरलेला आहे, याची माहिती कंपनीकडून मागविण्यात येत आहे. त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.-अजय तेलगोटे, निरीक्षण अधिकारी.पुरवठा विभाग.

 

टॅग्स :AkolaअकोलाCylinderगॅस सिलेंडर