शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला पाच महिन्यात ६० कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 10:48 IST

60 crore loss to ST in five months : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

- सागर कुटे

अकोला : एप्रिल व मे या महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. जून पासून ही सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे; परंतु सुरुवातीच्या काळात बहुतांश फेऱ्यांमधून डिझेल खर्चही निघणे कठिण झाले होते. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत अकोला विभागाला ६० कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

जवळपास दीड वर्षांपासून एसटीची प्रवासी सेवा कधी बंद तर, कधी सुरू राहत आहे. याचा एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त प्रमाणात उद्रेक झाल्याने पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामध्ये मार्च ते मे महिन्यापर्यंत ही सेवा बंद होती. काही दिवस अत्यावश्यक प्रवाशांसाठी फेऱ्या सोडण्यात आल्या ; मात्र त्याही तोट्यात राहिल्या. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात अकोला विभागाला १८ कोटी ९१ लाख ९८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर, २०१९ मध्ये या पाच महिन्यात ७९ कोटी ४ लाख ३६ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते.

 

किलोमीटरही घटले !

२०१९ ला एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत अकोला विभागाच्या बसेसने २ कोटी ५७ लाख १५ हजार किमी अंतर गाठले होते. तर, यावर्षी ७२ लाख ८५ हजार किमी अंतर पार केले. यामध्ये १ कोटी ८४ लाख ३० हजार किमी अंतर घटले आहे.

एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान उत्पन्न

२०१९

७९,०४,३६,०००

२०२१

१८,९१,९८,०००

अद्यापही ३० टक्के बसेस आगारातच!

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात रात्री १० पर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असून बसेसच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहे ; परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे अनेकवेळा प्रवासी मिळत नसल्याने जवळपास ३० टक्के बसेस आगारातच उभ्या आहे.

 

नाशिक, पुणे गाडीला प्रतिसाद!

दोन महिन्यांपासून ठणठण जाणाऱ्या नाशिक, पुणे, मुंबई गाडीला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. तसेच अमरावती व औरंगाबाद मार्गावर प्रवासी संख्या वाढली आहे. यामुळे आगार क्रमांक २ च्या उत्पन्नात थोड्या प्रमाणात भर पडत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी