शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जी; मूर्तिजापूर नगर परिषदेतील ६ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:04 IST

Murtijapur Municipal Council : आपत्ती व्यवस्थापनात अक्षम्य हलगर्जी केल्याबाबत ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी एका आदेशान्वये मंगळवारी निलंबित केले आहे.

मूर्तिजापूर : येथील नगरपरीषद  कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात अक्षम्य हलगर्जी केल्याबाबत ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी एका आदेशान्वये मंगळवारी निलंबित केले आहे.            शहरात कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षात घेता नगर परिषद कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून वळती केली आहे. अत्यावश्यक सेवा असताना कर्मचारी पुर्व परवानगी नघेता सतत गैरहजर राहणे, वरीष्ठाच्या आदेशाचे पालन नकरणे परस्पर सुटीचे अर्ज सादर करुन कार्यालय सोडून निघून जाणे यामुळे मान्सून पूर्ण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास खोळंबा निर्माण आहे आदी कारणे समोर करुन प्रेमेंद्र चौधरी (शिपाई ), शिवा दिपक बोयत (सफाई कामगार), नारायण दिनेश पावाल (सफाई कामगार), हरी दुधडे (सफाई कामगार), सतीश खंडारे (सफाई कामगार) व महादेव फावडे (सफाई कामगार) या ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी २५ मे रोजी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.        महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ७९ महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे तरतूदी नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. तसेच सदर आदेश अमलात असेल त्या कालावधीमध्ये मुख्याधिकारी नगर परिषद मूर्तिजापूर, यांच्या पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही व निलंबित काळात स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी करणे अनिवार्य राहिल असेही आदेशात म्हटले आहे. दोन शिक्षकांची वेतन कपात

आपती व्यवस्थापनाच्या कामात निष्काळजी केल्यामुळे रेहानाबी असलम खा, मुख्याध्यापिका मौलाना अबुल कलाम आझाद नप उर्दू शाळा मूर्तिजापूर, प्रभाकर शिरसाट सहायक शिक्षक जे. बी.नप हिंदी विद्यालय मूर्तिजापूर उपरोक्त दोन्ही शिक्षकांचे  एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. तर काही शिक्षकांना तशा सुचना देण्यात आल्या, तीन महिन्यांपूर्वी याच कारणावरून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते हे विशेष.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाsuspensionनिलंबन