शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

सिरसो गावची कथाच न्यारी; ६ झाले जिल्हाधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 17:26 IST

Murtijapur News : ६ जिल्हाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे नागरिक घडविले.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील शहराला लागूनच असलेले किमान दहा हजार लोकसंख्या असलेले सिरसो हे गाव, आता पर्यंत या गावाने ६ जिल्हाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे नागरिक घडविले. आतापर्यंत एवढे जिल्हाधिकारी होणारे एकही गाव या विभागात सापडणे अवघडच आहे. एवढेच नव्हे तर सद्यस्थितीत विविध क्षेत्रात अधिकारी म्हणून अनेक जण आपले कर्तव्य बजावत आहेत.            मुख्य गाव मूर्तिजापूर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर, या गावात प्राथमिक शिक्षणासाठी केवळ सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा, बहूदा सर्वच उच्च विभूतांनी याच शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले त्यानंतरचे माध्यमिक शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे जावे लागत असे शहरातही माध्यमिक शिक्षणासाठी बोटावर मोजण्याइतक्याच शाळा होत्या त्यातही गाडगे महाराज विद्यालय प्रसिद्ध असल्याने तिथेच प्रवेश मिळवायचे त्यानंतर याच शाळेची शाखा असलेल्या महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे लागे, पूर्वीच्या काळात वाहनाची कुठलीही सोय नसल्याने रोज सिरसो येथून कितीतरी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी सहा किलोमीटर जाणे आणि संध्याकाळी परत येणे अशी बारा किलोमीटरची पायपीट करावी लागत असे अशा परिस्थितीतही या गावचे विद्यार्थी घडले आणि आता पर्यंत या गावाने ७ जिल्हाधिकारी, ४ तहसीलदार, ३ गटविकास अधिकारी, दिलेल एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय उर्फ बाळासाहेब मेहरे याच गावचे आहेत, त्याच बरोबर डॉ. रविंद्र खंडारे हे केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आहेत, प्रा. डॉ. श्याम खंडारे पदवी पदव्युत्तर समाजशास्त्र विभाग प्रमुख आहेत, डॉ. भगवान ढाकरे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्राध्यापक आहेत, पुजा माटोडे (हरणे) या घाटंजी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत, ओंकार गाठेकर हे गटविकास अधिकारी, अभिजित बन्नोरे सहायक गटविकास अधिकारी, डॉ. नरेंद्र हरणे हे प्राचार्य, डॉ. जुगल मालधुरे हे प्राध्यापक, शंकर विसळ अभियंता, किरण विसळ अभियंता, सुमेद खिराळे प्रशासकीय अधिकारी, डाॅ. स्वाती गवई, राहूल खंडारे राज्यकर सहायक स्टेट टॅक्स असिस्टंट, राधिका देशमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आता पर्यंत या गावाने ७४ अधिकारी,  दिले असून सद्यस्थितीत ७८ एवढे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. याच बरोबर स्वातंत्र्य सैनिक, साहित्यिक, सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, शिक्षक, वकील, डॉक्टर असे समाजसेवी व्रतस्थ या गावातून घडले आहे. शासकिय सेवेत आतापर्यंत २०७ लोकांनी आपले कर्तव्य बजावले आहे. याच धर्तीवर 'सिरसोचे मातब्बर' विजय हरणे संपादित एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले असून या पुस्तकात कर्मचारी ते जिल्हाधिकारी व पदाधिकारी यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. हे झाले जिल्हाधिकारी, तहसीलदार भगवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), जयवंतराव देशमुख (जिल्हाधिकारी), राजाभाऊ देशमुख(जिल्हाधिकारी), बलदेवसिंह हरणे (निवासी उपजिल्हाधिकारी) , पंजाबराव वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), दिनेशचं वानखडे (अप्पर जिल्हाधिकारी), गणपतराव मेहरे (तहसीलदार), पुजा माटोडे(हरणे)(तहसीलदार), मुकुंदराव अंबाडे (तहसीलदार), देवराव इंगळे(तहसीलदार) कलेक्टरचे गाव, ही वेगळी ओळखसिरसो या गावात आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात अनेक अधिकारी घडले आहेत परंतु एकेकाळी या गावाने वेगळी ओळख निर्माण केली, आतापर्यंत ६ जिल्हाधिकारी या गावाने दिल्याने कलेक्टरचे गाव म्हणून या पंचक्रोशीतील ओळखल्या जायचे, ही ओळख आजही कायम आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला