शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५९ हजार विद्यार्थी शालेय गणवेशाविनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:01 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगर  परिषद व शासकीय शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी तील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना आहे; परंतु  शैक्षणिक सत्र सुरू होऊनही अडीच महिने लोटले तरी  जिल्हय़ातील ५९ हजार ३१0 विद्यार्थी शालेय  गणवेशाविनाच आहेत. ६४ हजार ६३६ विद्यार्थ्यांपैकी  केवळ ५ हजार ३२६ विद्यार्थ्यांनाच गणवेश प्राप्त झाले  आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास  आडकाठी निर्माण केल्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेशा पासून वंचित राहावे लागत आहे. 

ठळक मुद्देझीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास बँकांचा नकारकेवळ पाच हजार विद्यार्थ्यांनाच गणवेश

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगर  परिषद व शासकीय शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी तील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची योजना आहे; परंतु  शैक्षणिक सत्र सुरू होऊनही अडीच महिने लोटले तरी  जिल्हय़ातील ५९ हजार ३१0 विद्यार्थी शालेय  गणवेशाविनाच आहेत. ६४ हजार ६३६ विद्यार्थ्यांपैकी  केवळ ५ हजार ३२६ विद्यार्थ्यांनाच गणवेश प्राप्त झाले  आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास  आडकाठी निर्माण केल्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेशा पासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने प्राथमिक शिक्षण विभागाला ६४ हजार विद्यार्थ्यांना  प्रत्येकी दोन गणवेशासाठी ४00 रुपये याप्रमाणे  २५,८५४,४00 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.  शिक्षण विभागाने गटसाधन केंद्रांमार्फत ९६६ शाळांना ही र क्कम वळतीसुद्धा केली; मात्र विद्यार्थ्यांची झीरो बॅलन्सवर  खाते उघडण्यास राष्ट्रीयीकृत बँका आढेवेढे घेत असल्यामुळे  विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा होण्यास  विलंब होत आहे. जिल्हय़ात आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या  आई-वडिलांसोबत १९ हजार ६२६ संयुक्त बँक खाते  उघडण्यात आले. त्यापैकी आईसोबत विद्यार्थ्यांंचे संयुक्त खाते असलेल्या  ५३२६ बँक खात्यात गणवेशाचे पैसे जमा झाले आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांकडून विद्यार्थ्यांनी किमान हजार रुपये  भरून बँक खाते उघडण्याचा आग्रह होत असल्याने, विद्या र्थी व पालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.  केवळ ४00 रुपयांच्या अनुदानासाठी बँकेत किती चकरा  घालायच्या, असा प्रश्न पालकांनी केला आहे. शेकडो  पालक तर बँकांचे आठमुठे धोरण आणि शिक्षण विभागाने  दोन गणवेशासाठी दिलेले अत्यंत तोकडे ४00 रुपये  घेण्यासही तयार नाहीत. ४५ हजार विद्यार्थ्यांंची बँकांमध्ये  खाते न उघडल्या गेल्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागासमोर  गणवेशाची रक्कम जमा करावी तरी कशी, असा प्रश्न  निर्माण झाला आहे. 

शिक्षण विभाग देणार बँकांना पत्रझीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास राष्ट्रीयीकृत बँका नकार देत  असल्याने, गणवेशासाठी मिळणारे ४00 रुपये अनुदान  घ्यावे कसे आणि बँकेत खाते नसल्याने अनुदान जमा करावे  कसे, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसोबतच प्राथमिक  शिक्षण विभागाला पडला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी  शिक्षण विभाग बँकांना पत्र देण्यासोबतच शिक्षणाधिकारी, उ पशिक्षणाधिकारी बँकेच्या अधिकार्‍यांच्या भेटी घेणार आहे त. 

४00 रुपयांसाठी बँकांच्या चकरा कशाला?महागाईच्या काळात ४00 रुपयांत दोन गणवेश मिळतात का,  असा प्रश्न करीत पालकांनी गणवेश खरेदी करायचा आणि  त्याचे बिल घेऊन मुख्याध्यापकाला द्यायचे. त्यानंतर बँक  खात्यात ४00 रुपये रक्कम जमा होईल आणि बँकेत खाते  उघडायला गेलो तर बँक झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास  नकार देतात. त्यापेक्षा आम्हाला ४00 रुपयेही नको आणि  बँकांच्या चकरा नको, असे पालकांचे म्हणणे आहे. 

झीरो बॅलन्सवर खाते उघडण्यास बँका तयार नाहीत. त्यांना  आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र देणार आहोत. ५९ हजार विद्यार्थ्यांंचे बँक खाते उघडल्या  न गेल्यामुळे कदाचित अनुदानाची रक्कम परत जाऊ शकते. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग.