शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील कपाशीचे ५६ टक्के पंचनामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:55 IST

अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील  कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण झाले असून, पंचनामे तातडीने करून पीक नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देदोन दिवसात अहवाल सादर करा जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील  कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण झाले असून, पंचनामे तातडीने करून पीक नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या आढावा बैठकीत दिले.राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे., तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदारांना दिला होता. त्यानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यात तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले; परंतु  पंचनामे करण्याचे काम  संथ गतीने सुरू असल्याच्या मुद्दयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १३ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदारांना दिला होता.  त्यानंतर  सोमवार, १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेऊन, कपाशी पीक नुकसानाच्या पंचनामे कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये १८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील उर्वरित  कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या बैठकीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले.

जिल्ह्यात कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याच्या कामाला गती आली आहे. १८ डिसेंबरपर्यंत ५६ टक्के कपाशी नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, उर्वरित पंचनामे तातडीने करून दोन दिवसात कपाशी पीक नुकसानाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार व उपविभागीय अधिकार्‍यांना दिले.-आस्तिककुमार पाण्डेयजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :Akola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयcottonकापूस