शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ५५७ विकास कामांपैकी केवळ ३४ कामे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:25 IST

कंत्राटदारांनी केवळ ३४ विकास कामे निकाली काढल्यामुळे उर्वरित विकास कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील की नाही, यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

- आशिष गावंडेअकोला: महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या नवीन प्रभागांमधील विकास कामांचा अनुशेष दूर करण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने १०० कोटींपैकी ९७ कोटींचा निधी वितरित केला. प्राप्त निधीतून जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या ५५७ विकास कामांपैकी मनपा प्रशासनाने मार्च महिन्यात पहिल्या टप्प्यात ४५९ विकास कामांचेकार्यादेश जारी केले. मागील पाच महिन्यांत संबंधित कंत्राटदारांनी केवळ ३४ विकास कामे निकाली काढल्यामुळे उर्वरित विकास कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण होतील की नाही, यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मनपा क्षेत्राची हद्दवाढ करून शहरालगतच्या २४ गावांचा मनपात समावेश करण्यात आला. हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी मनपाने शासनाकडे सादर केलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावापैकी ९६ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला. त्यावेळी पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. विकास कामांचा निधी तातडीने प्राप्त व्हावा, यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. यादरम्यान, मनपाने हद्दवाढ क्षेत्रातील नवीन प्रभागांसाठी विविध विकास कामांचे एकूण ६१० प्रस्ताव तयार केले होते. त्यापैकी ५५७ प्रस्तावांना राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर मनपा प्रशासनाने निविदा प्रकाशित केली. यादरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधारी भाजपने मार्च महिन्यात ४५९ विकास कामांचे कार्यादेश जारी केले होते. मागील साडेपाच महिन्यांच्या कालावधीत संबंधित कंत्राटदारांनी केवळ ३४ विकास कामे निकाली काढली असून, यामध्ये रस्त्यांचा समावेश आहे.रहिवाशांमध्ये नाराजी; नगरसेवक त्रस्तहद्दवाढ क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. मनपाच्या ४५९ प्रस्तावांंमध्ये रस्ते, नाल्या, जलवाहिनी, विद्युत खांब, पथदिवे, उद्यानांचे सौंदर्यीकरण, सामाजिक सभागृह आदी विकास कामांचा समावेश आहे. कंत्राटदारांनी उन्हाळ्यात सुरू केलेल्या कामांपैकी आज रोजी केवळ ३४ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर असून, नगरसेवकांवर प्रश्नांचा भडिमार केला जात असल्याची परिस्थिती आहे.उर्वरित कामांची ‘वर्क आॅर्डर’ कधी?मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या ४५९ प्रस्तावांसाठी सहा निविदा प्रकाशित करण्यात आल्या होत्या. यापैकी चार कामांसाठी निविदा अर्ज प्राप्त झाले होते. सदर कामांची किंमत ५५ कोटी ४८ लाख रुपये होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आटोपल्यानंतर प्रशासनाने उर्वरित ९८ विकास कामांची ‘वर्क आॅर्डर’ जारी करणे क्रमप्राप्त होते. एकीकडे सत्ताधारी विकास कामांचा गवगवा करीत असताना मनपा प्रशासन अशा कामांच्या वर्क आॅर्डरबद्दल गोपनीयता का ठेवते, असा सवाल उपस्थित होऊन प्रशासनाच्या हेतूवर शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत.

 

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला