शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

अकोला जिल्ह्यात रविवारी ५४३ कोरोना पॉझिटिव्ह; ९४ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:08 IST

543 corona positive in Akola distric ४८३, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६० असे एकूण ५४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २० मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४८३, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६० असे एकूण ५४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २४,४०९ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०२४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५४१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये बार्शीटाकळी येथील ५३, तेल्हारा येथील ४६, हिवरखेड येथील १८, डाबकी रोड येथील १६, पातूर येथील १४, भंडारज बु. येथील १२, बोरगाव येथील ११, जीएमसी व पारस येथील प्रत्येकी नऊ, खडकी, अडगाव बु., बाळापूर येथील प्रत्येकी सात, बाळापूर नाका व कृषी नगर येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, खदान, सोनटक्के प्लॉट, अकोट फैल, चांडक प्लॉट, वाडेगाव, मोठी उमरी दोनवाडा, जवाहर नगर, खोलेश्वर, टिटवा व नागठाणा येथील प्रत्येकी तीन, हरिहर पेठ, जूने शहर, गजानन नगर, रणपिसे नगर, बोरगाव वैराळ, मुर्तिजापूर, मलकापूर, झुरळ बु., उरळ बु., पिंपळखुटा, व्हिएचबी कॉलनी, पोळा चौक, कोळंबी, चांदुर व केळकर हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, कच्ची खोली, उगवा, जूने आरटीओ रोड, कौलखेड, विवरा, मालसूर, नेरधामणा, जाजू नगर, गीता नगर, इंद्रा कॉलनी, भिम नगर, अंबिका नगर, खरप, फडके नगर, तिवसा, तारफैल, सालासार मंदिर, माधव नगर, आश्रय नगर, गुल्दवाला प्लॉट, हमजा प्लॉट, माळीपुरा, गुडधी, देगाव, मांडवा, तळेगाव बाजार, पाथर्डी, नयागाव, राधेनगर, गणेश सोसायटी, निमवाडी, सिंधी कॅम्प, वनी रंभापूर, लक्ष्मीनगर, हाता, नया अंदुरा, वाशिम बायपास, रिधोरा, राहुलनगर, लहान उमरी, कंवर नगर, तापडीया नगर, अमाखाँ प्लॉट, महागाव, म्हैसपूर, रजपूतपुरा, गोरक्षण रोड, रामदासपेठ, शास्त्री नगर, शिवाजी नगर, साई नगर, अनिकट, लकडगंज, मोहता मिल, चिखलगाव, दाबकी, खेळ मुंगसांजी, तळेगाव पार्तुडा, बलवंत कॉलनी, सातव चौक, जठारपेठ, हिंगणा फाटा, सोमठाना व अमोना ता.अकोट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी मुर्तिजापूर येथील १३, मोठी उमरी येथील ११, लहान उमरी येथील सहा, कौलखेड, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच, गांधीग्राम, डाबकी रोड व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी व खदान येथील प्रत्येकी तीन, कमला नगर, कमल सोसायटी, न्यु खेतान नगर, देशमुख फैल, लक्ष्मी नगर, शमशेरपुर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन, न्यु तापडीया नगर, आळशी प्लॉट, गंगा नगर, खरप बु., भारती प्लॉट, चैतन्यवाडी, रवीनगर, दुर्गा चौक, बिर्ला कॉलनी, गड्डम प्लॉट, खेडकर नगर, दहिहांडा, कृषी नगर, अशोक नगर, कंचनपुर, कासनापूर, बाळापूर, अकोट फैल, दगडगाव, खडकी, शास्त्री नगर, पिंपळनेर, दिग्रस खुर्द, नेरधामना, येवतखेड, गजानन नगर, तापडीया नगर, कृषि नगर, शिवनी, रामकृष्ण नगर, कोठारी नगर, एमआयडीसी, पिकेव्ही, सांगवी खुर्द, हिंगणा, सहकार नगर, भंडारज ता.पातूर, गिता नगर, कृषी नगर, खडकी, सांगळूद, गोकूल कॉलनी, तेल्हारा, राम नगर, रणपिसेनगर, घुसर, सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, अडगाव ता.पातूर, सावतवाडी, जवाहर नगर, व्हीएचबी कॉलनी, केशवनगर, गोरक्षण रोड, मोहिते प्लॉट, न्यु तार फैल, उमरी, नरहरी नगर व पळसो बढे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

९४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, अवघाते हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, बॉईज हॉस्टेल अकोला येथून १५, अकोला ॲक्सीडेंट येथून तीन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, आयुर्वेदिक हॉस्पीटल येथून दोन तर कोविड केअर सेंटर बाळापूर येथून दोन, अशा असे एकूण ९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

६,२२४ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४,४०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,७६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,२२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला