शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ५३ पॉझिटिव्ह; नऊ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:35 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४६२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४६२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तेल्हारा येथील पाच, रामदास पेठ येथील दोन, तर शिवाजी चौक, जठार पेठ, चिखलगाव, शिवनी, तुळजापूर (ता. पातूर), जीएमसी होस्टेल, जुने शहर, खेडकरनगर, बार्शीटाकळी, सिटी कोतवाली, केडिया प्लॉट, कुबेरनगर, खेताननगर, कौलखेड, बोरगाव मंजू, माळीपूर, मोठी उमरी, रतनलाल प्लॉट व कापशी तलाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात स्वराज पेठ येथील चार, कॉटन मार्केट, अकोट, सिंधी कॅम्प, अकोट फैल, गो-रक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर कळंबा बु. (ता. बाळापूर), ज्ञानखेड, उरळ, रामनगर, गजानन नगर, जीएमसी, डाबकी, जगजीवनराम नगर, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रॅपिड चाचण्यांमध्ये सहा पॉझिटिव्ह

शुक्रवारी झालेल्या एकूण १५० रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २६,७३३ चाचण्यांमध्ये १८४९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नऊ जणांना डिस्चार्ज

शुक्रवारी सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

७३१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८३० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७३१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.