शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

५२ वर्षांत अकोला जिल्ह्यातील १४ जवान देशासाठी शहीद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:53 IST

अकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे.

- संतोष येलकरअकोला: देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना गेल्या ५२ वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले असून, वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत या शहीद जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले आहे.जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४४ जवान शहीद झाले. शहीद जवानांना देशभरात मानवंदना अर्पण करण्यात येत असून, शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त होत आहेत. त्यानुषंगाने सैन्य दलात देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करलेल्या जिल्ह्यातील जवानांची माहिती जाणून घेतली असता, १९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले. त्यामध्ये महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, आर्टिलरी रेजिमेंटमधील जवानांचा समावेश आहे. १९६५ व १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्ध मोहिमेसह आॅपरेशन मेघदूत व आॅपरेशन रक्षक अशा वेगवेगळ्या युद्ध मोहिमेत जिल्ह्यातील १४ जवानांनी देशासाठी वीरमरण पत्करले.१९६५ ते २०१७ दरम्यान शहीद झालेले जवान!जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार १९६५ ते २०१७ या ५२ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील १४ जवान शहीद झाले. त्यामध्ये दुर्योधन झाबुजी सिरसाट, महादेव नामदेव तायडे, प्रल्हाद भोलाजी साव, आनंद सकाराम काळपांडे, हरिश्चंद्र पंढरी वानखडे, संतोष खुशाल जामनिक, भास्कर श्रीराम पातोंड, विजय बापूराव तायडे, विनोद यशवंत मोहोड, कैलाश काशीराम निमकंडे, प्रशांत प्रल्हाद राऊत, संजय सुरेश खंडारे, आनंद शत्रुघ्न गवई व सुमेध वामनराव गवई या शहीद जवानांचा समावेश आहे.जिल्ह्यात असे आहेत माजी सैनिक!तालुका                 माजी सैनिकअकोला                    ९३२अकोट                     २२५बाळापूर                   २८८मूर्तिजापूर                २०६बार्शीटाकळी                ९१तेल्हारा                      ८५पातूर                        १०८...........................................एकूण                      १९३५

 

टॅग्स :AkolaअकोलाMartyrशहीद