शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 10:53 IST

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola ५१ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

अकाेला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मंगळवारी स्थापनेचा ५१ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी यानिमित्ताने तीन दिवसीय विदर्भस्तरीय शिवारफेरीचे आयोजन अतिशय हर्षोल्हासात करण्यात येते; मात्र यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर औपचारिक स्वरूपात एक दिवसीय शिवारफेरीचे आयोजन अकोला मुख्यालयात करण्यात आले होते. विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्या परिसरात आयोजित छोटेखानी उद्घाटनप्रसंगी प्रथम नोंदणी करणाऱ्या महिला शेतकरी सरस्वती इंगळे, रा. गोरेगाव यांच्या शुभहस्ते फीत कापून एक दिवसीय शिवारफेरीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रसंगी शेतकरी प्रतिनिधी म्हणून विशेषत्वाने उपस्थित असलेले विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांच्यासह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित शेतकरी वर्गांनी सेंद्रिय शेती विकास प्रकल्प, कापूस संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, मिरची तथा भाजीपाला संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती विकास केंद्र, फळसंशोधन केंद्र, यंत्रे तथा अवजारे विभाग तथा पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाला भेटी देत प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले. शिवार फेरीसाठी केवळ ५० शेतकरी बांधवांना उपस्थित होण्याची परवानगी मिळाली असल्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दत्तक ग्राम कौलखेड गोमासे, गोरेगाव, सिंदखेड, भौरद, म्हातोडी आदी गावातील प्रत्येकी १० शेतकरी बंधू-भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात शिवारफेरीसाठी सहभागी करून घेण्यात आले होते.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला