शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

५१ नगरसेवकांनी केल्या स्वाक्षरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:04 IST

अकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याविरोधात  अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी भाजपाच्या गोटात  हालचाली वाढल्या आहेत. मंगळवारी स्थानिक मंगल  कार्यालयात पार पडलेल्या भाजपाच्या बैठकीत ५१  नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी स्वाक्षरी  केल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देभाजपाच्या बैठकीत आयुक्तांच्या विरोधातील अविश्‍वासावर  खलबतेकाँग्रेस, राष्ट्रवादी भाजपसोबत?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याविरोधात  अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी भाजपाच्या गोटात  हालचाली वाढल्या आहेत. मंगळवारी स्थानिक मंगल  कार्यालयात पार पडलेल्या भाजपाच्या बैठकीत ५१  नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी स्वाक्षरी  केल्याची माहिती आहे. मागील सात महिन्यांमध्ये नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांकडे  दुर्लक्ष करीत महापालिका आयुक्त अजय लहाने त्यांच्या स्तरावर  कामे निकाली काढत आहेत. प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांचा  बोजवारा उडालेला आहे. साफसफाईची ऐशीतैशी झाली असून,  पथदिव्यांच्या समस्येने सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.  मनपा अधिकार्‍यांकडे समस्यांचे कथन केल्यानंतर त्या निकाली  काढणे अपेक्षित आहे. तसे न होता प्रशासनाकडून नगरसेवकांचा  वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप सत्ताधारी भाज पाचे नगरसेवक करीत आहेत. प्रभागात नागरिकांचा रोष आणि  मनपात अधिकार्‍यांकडून होणारा अपमान लक्षात घेता भाजपाने  महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याविरोधात अविश्‍वास  प्रस्ताव दाखल करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. त्या पृष्ठभूमीवर स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी २३  ऑक्टोबर रोजी महापौर विजय अग्रवाल यांना विशेष सभा  घेण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला. मंगळवारी सकाळी स्थानिक  मंगल कार्यालयात भाजपाची बैठक पार पडली असता स्थानिक  सर्व नेते, मनपातील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.  आयुक्तांवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी भाजपाला  ५0 नगरसेवकांच्या संख्याबळाची आवश्यकता आहे. या  बैठकीत ५१ नगरसेवकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे.