शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५०० टनाची अट शिथिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 13:59 IST

५०० मेट्रिक टन कचऱ्याची अट शिथिल करून ती २०० मेट्रिक टन करण्याचा प्रस्ताव सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला असता, या प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्दे केंद्र शासनाने ‘वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पात सहभागी शहरांसाठी ५०० मेट्रिक टन कचऱ्याची अट नमूद केली होती. त्यामध्ये ओला व सुका कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. च्छ भारत अभियानचे प्रकल्प संचालक व्ही.के.जिंदल यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून त्याला मंजुरी दिली.

अकोला: शहरातून निघणारा दैनंदिन कचरा ५०० मेट्रिक टन असेल तरच अशा शहरांचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रोजेक्टमध्ये समावेश करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश होते. या अटीमुळे लहान शहरांची कोंडी झाली होती. त्यामुळे ५०० मेट्रिक टन कचऱ्याची अट शिथिल करून ती २०० मेट्रिक टन करण्याचा प्रस्ताव सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला असता, या प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. केंद्रीय मंत्र्यांच्या निर्णयामुळे देशभरातील लहान शहरांचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महापालिका क्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करून योग्यरीत्या विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे प्रदूषणासोबतच जलस्रोत दूषित होण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याचे समूळ उच्चाटन व्हावे, या उद्देशातून केंद्र शासनाने ‘वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पात सहभागी शहरांसाठी ५०० मेट्रिक टन कचऱ्याची अट नमूद केली होती. शहरातून निघणाऱ्या घनकचऱ्यांचे ७५टक्के विलगीकरण करण्यासाठी शासनाने महापालिकांना जून २०१८ पर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये ओला व सुका कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. अकोला शहरात दररोज २०० ते २५० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यामुळे केंद्र शासनाने ५०० मेट्रिक टनाची अट शिथिल केल्यास ‘वेस्ट टू एनर्जी’प्रकल्पात अकोला महापालिकेला सहभागी होता येणार असल्याचा मुद्दा महापौर विजय अग्रवाल यांनी उपस्थित केला होता. यासंदर्भात महापौर अग्रवाल यांनी आठ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. सोमवारी या विषयावर महापौर अग्रवाल यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घनकचऱ्यासाठी २०० मेट्रिक टनाचा प्रस्ताव सादर केला. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी प्रकरणे मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत अभियानचे प्रकल्प संचालक व्ही.के.जिंदल यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून त्याला मंजुरी दिली.

घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डीपीआर तयार आहे. केंद्राने ५०० टनाची अट नमूद केल्याने डीपीआरला मंजुरी दिली नव्हती. आता ही अट शिथिल झाली आहे. सुका कचऱ्यापासून वीज निर्मिती करायची असल्यास ५ एमएलडीची पाइपलाइन व इतर सुविधा उपलब्ध केल्या जातील. केंद्राच्या निर्णयामुळे देशभरातील लहान शहरांना दिलासा मिळाला आहे.-विजय अग्रवाल, महापौर.राज्य शासनाने डीपीआर तयार करण्यासाठी अमरावती विभागातील नगर परिषद व दोन मनपासाठी ‘मार्क’ कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीने डीपीआर तयार केला असून, केंद्र शासनाने ५०० मेट्रिक टन घनकचऱ्याची अट शिथिल केल्याने मनपाला दिलासा मिळाला आहे.-जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका