शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५0 मुख्य रस्त्यांच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:47 IST

अकोला : शहराच्या विविध भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्याचे काम वेगात सुरू झाले असून, रस्त्यांवर लख्खं उजेड निर्माण झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता पथदिव्यांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी महापालिका सरसावल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देशहरात एलईडीचा लख्ख उजेडमुख्य मार्ग उजळले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराच्या विविध भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्याचे काम वेगात सुरू झाले असून, रस्त्यांवर लख्खं उजेड निर्माण झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता पथदिव्यांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी महापालिका सरसावल्याचे दिसून येते. शहराच्या मुख्य मार्गांवरील सोडियम पथदिव्यांऐवजी सीएफएल पथदिवे बसवण्याचा निर्णय २00६ मध्ये महापालिकेने घेतला होता. याकरिता एशियन नामक कंपनीसोबत २0१३ पर्यंत करारनामा करण्यात आला. परंतु देयक थकीत राहत असल्यामुळे पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची सबब पुढे करीत कंपनीने देखभाल दुरुस्तीसाठी आखडता हात घेतला. शिवाय अंधूक उजेडामुळे अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता. ही बाब ध्यानात घेता महापालिकेने लख्खं प्रकाश देणारे एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेत शासनाकडून १0 कोटींचा निधी खेचून आणला. त्यामध्ये मनपा प्रशासनाने चौदाव्या वित्त आयोगातून १0 कोटींची तरतूद करीत एकूण २0 कोटी रुपयांतून एलईडी पथदिव्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवली. प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीची संथ गती पाहता लोकप्रतिनिधींनी कंपनीचे कान टोचताच पथदिवे लावण्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाल्याचे दिसून येते. 

३0 कोटींतून केवळ एलईडीची कामे!शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे उभारण्यासाठी २0 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. प्रशासनाने २0 कोटींच्या कामाचा कंत्राट दिला असतानाच आता नव्याने १0 कोटींच्या निधीसाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून पथदिव्यांसाठी १0 कोटींचा निधी मंजूर केला आहे. एकूणच शहरात पहिल्यांदाच ३0 कोटी रुपयांतून केवळ एलईडी पथदिव्यांची कामे होतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

५0 रस्ते, ११७  चौकांमध्ये उजेड!२0 कोटी रुपयांतून शहरातील प्रमुख ५0 रस्त्यांसह तब्बल ११७ चौकांमध्ये ‘एलईडी’ पथदिवे उभारल्या जात आहेत. या कामासाठी प्रशासनाने मे. रॉयल पॉवर टर्नकी इम्प्लिमेंट्स प्रा.लि. पुणे कंपनीची नेमणूक केली आहे.मागील तीन दिवसांत जुने शहरातील श्रीवास्तव चौक ते कस्तुरबा गांधी रुग्णालय  रस्ता, अशोक वाटिका ते सवरेपचार रुग्णालय, नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालय या तीन प्रमुख रस्त्यांवर पथदिवे लावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त प्रभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात एलईडी पथदिव्यांची कामे सुरू असल्याचे चित्र आहे.-