शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

दुर्धर आजार रुग्णांसाठी ५० लाखांची योजना

By admin | Updated: April 19, 2017 01:46 IST

अकोला- जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना राबविण्याचा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभेत ठरावअकोला : दुर्धर आजार रुग्णांना आर्थिक मदत योजनेंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी ५० लाख रुपयांची योजना राबविण्याचा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला.दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी ५० लाखांच्या योजनेला मंजुरी देत, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना मदत देण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले. समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला या सभेत मंजुरी देण्यात आली, तसेच बाळापूर तालुक्यातील उरळ येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय बाळापूर येथे तालुक्याच्या ठिकाणी स्थानांतरित करण्याचे निर्देशही सभेत देण्यात आले. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत कामाचा आढावा सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जमीरउल्लाखॉ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य गुलाम हुसेन देशमुख, विजय लव्हाळे, मंजूषा वडतकार, गोदावरी जाधव यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.‘त्या’ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करा!जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जमीरउल्लाखॉ पठाण यांनी सोमवारी उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथील दोन आरोग्य अधिकारी व सहा कर्मचारी गैरहजर आढळून आले. गैरहजर आढळून आलेल्या संबंधित दोन वैद्यकीय अधिकारी व सहा कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आले.