शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के बालके आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:20 IST

अंगणवाडी परिसरातील सर्वेक्षण केलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक बालके पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केवळ शासकीय अंगणवाड्यांमध्ये शिकत असलेल्या बालकांनाच पोषण आहार दिला जात असल्याने अंगणवाडी परिसरातील सर्वेक्षण केलेल्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक बालके पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती आहे. खासगी कॉन्व्हेंट, शाळांमध्ये जाणाऱ्या बालकांनाही पोषण आहार दिला जावा, अशी मागणी सातत्याने होत असतानाही शासनाकडून हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत आहे. दरम्यान, मार्च-एप्रिल दोन महिन्यांसाठी अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिला जाणारा पोषण आहाराचा पुरवठाही ३० एप्रिल रोजी म्हणजे, ४२ दिवस उशिराने झाल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, बालकांकडे आधी असलेला पोषण आहार १८ मार्च रोजीच संपला होता. इतके दिवस बालकांना पोषणापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे २३ मार्च रोजी लॉकडाउन करण्यात आले. त्यापूर्वी म्हणजे,१८ मार्च रोजीच बालकांना आधी पुरवठा केलेला आहार संपुष्टात आला होता. त्यावेळी आहार पुरवठा होणे आवश्यक होते. ही बाब महिला व बालकल्याण विभागाच्या वरिष्ठांनाही सांगण्यात आली; मात्र लॉकडाउन आहे, वाहनांना परवानगी नाही, या कारणाने पोषण आहार पुरवठ्याला तब्बल ४२ दिवस उशीर झाला आहे. त्यातही शहरातील काही भागात अद्याप पुरवठाच झालेला नाही. ऐन लॉकडाउनच्या काळात पोषण आहार नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील बालकांना त्यापासून वंचित राहावे लागले आहे. आता पुढील दोन महिन्यांसाठी पोषण आहार पुरवठ्यासाठीची मागणी महिला व बालकल्याण विभागाकडून केली जात आहे. त्यानुसार मे व जून महिन्याच्या धान्याचा पुरवठा होऊ शकतो.

आहार वाटपाची ठरलेली पद्धतशासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून तीन ते सहा वर्षांच्या बालकांना प्रती दिन, प्रती लाभार्थी ८ रुपये खर्च करून ५०० किलो कॅलरीज उष्मांक असणाºया पाककृती-१ मध्ये गहू, मसूर डाळ, मिरची, हळदी, मीठ, सोयाबीन तेल, चवळी हे सर्व मिळून एकूण-१४२ ग्रॅम प्रतिदिन द्यावे लागते. त्याचे एकत्रित वाटप करताना ५० दिवसांसाठी ७ किलो १०० ग्रॅम धान्य द्यावे लागते. तर पाककृती-२ मध्ये सर्व घटकातील दोन कडधान्य वगळून मूग डाळ, मटकी हे धान्य देत दैनंदिन १४० ग्रॅम धान्य असे ५० दिवसांसाठी ६ किलो ९५० ग्रॅम द्यावे लागते.

सर्वच तालुक्यात लवकरच पुरवठा!लॉकडाउनमुळे अंगणवाड्या बंद झाल्या. त्यानंतर बालकांना गरम, ताजा आहार देणे अशक्य झाले. त्याऐवजी घरीच कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी कंझ्युमर्स फेडरेशनला २३ मार्च रोजी आदेश दिला. त्यानुसार २० एप्रिलपासून पुरवठा सुरू झाला. सर्वच तालुक्यांमध्ये लवकरच पूर्ण होईल.- विलास मरसाळे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जि.प.

टॅग्स :Akolaअकोला