आगर : येथून जवळच असलेल्या उगवा येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध व हिंदू धर्माच्या ४९ जोडप्यांच्या साता जन्माच्या गाठी बांधल्या गेल्या. सामाजिक न्याय विभाग व निर्भय बुद्ध संस्था उगवा यांच्या संयुक्त विद्यमाने कन्यादान योजनेंतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपस्थित बौद्ध जोडप्यांचा बौद्ध धर्माप्रमाणे, तर हिंदू जोडप्यांचा हिंदू रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला. यावेळी सर्वच जोडप्यांचे नातेवाईक, हितचिंतक व मित्रमंडळी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उगवा येथील यंग स्टार मंडळाचे सदस्य व बौद्ध उपासिकांनी परिश्रम घेतले.
सामूहिक विवाह सोहळ्यात ४९ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: June 15, 2014 22:03 IST