शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

४६ हजारांवर शेतकर्‍यांनी काढला पीक विमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:10 IST

अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गत ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ात ४६ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’अर्ज भरले आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विमा काढण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे.

ठळक मुद्दे‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याची मुदत उद्यापर्यंतपीक विमा काढण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गत ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ात ४६ हजार शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’अर्ज भरले आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांना पीक विमा काढण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम बँकांमध्ये जमा करण्याची मुदत गत ३१ जुलैपर्यंत होती. त्यानुसार जिल्हय़ात पीक विमा काढण्यासाठी जिल्हय़ात गत ३१ जुलैपर्यंत ४६ हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरले. दरम्यान, पीक विमा योजनेंतर्गत विमा काढण्यासाठी शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यास ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाच्या कृषी खात्यामार्फत १ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. त्यानुसार बिगर कर्जदार शेतकरी ४ ऑगस्टपर्यंत पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. पीक विमा काढण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला असल्याने पीक विमा काढण्यासाठी अर्ज भरणे आणि विमा हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी शेतकर्‍यांना धावपळ करावी लागत आहे.

सेतू केंद्रांवर भरले जाणार अर्ज!पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढणार्‍या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज आणि विमा हप्त्याची रक्कम गत ३१ जुलैपर्यंत बँकांमध्ये स्वीकारण्यात आली; मात्र पीक विमा काढण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढीच्या शासन निर्णयानुसार पीक विमा काढणार्‍या बिगर कर्जदार शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज आता बँकांमध्ये भरले जाणार नसून, केवळ महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) इत्यादी सेतू केंद्रांवर भरण्यात येणार आहेत. विमा हप्त्याची रक्कमदेखील सेतू केंद्रांवर स्वीकारण्यात येणार आहे, तसेच राष्ट्रीय कृषी विमा कंपनीच्या संकेतस्थळावरदेखील शेतकर्‍यांना विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, नेट बँकिंगद्वारे विमा हप्त्याची रक्कम भरता येणार आहे.

पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी गत ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ात जवळपास ४६ हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. शासन निर्णयानुसार पीक विमा काढण्यासाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.- रवींद्र निकम,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.