शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर तालुक्यातील ४५५ विहिरींचा वांधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:16 IST

पातूर तालुक्यातील ६० पेक्षाही अधिक विहिरींची पडताळणी करणे बाकी असल्याने चौकशी अहवाल तयार झालेला नाही.

अकोला : धडक सिंचन विहिरी योजनेच्या लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना मंजुरी दिल्याप्र्रकरणी ग्राम पंचायतनिहाय तपासणीमध्ये बाळापूर तालुक्यातील मंजूर असलेल्या ४५५ विहिरींच्या कामांना सुरुवातच झालेली नाही. त्यापैकी लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे, तर पातूर तालुक्यातील ६० पेक्षाही अधिक विहिरींची पडताळणी करणे बाकी असल्याने चौकशी अहवाल तयार झालेला नाही. ही बाब विभागीय आयुक्त पीयुषसिंह यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत उघड झाली.पातूर-बाळापूर तालुक्यतील विहिरींच्या घोळाचा संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश शासनाने दिल्यानंतर त्या दोन्ही तालुक्यांतील विहिरी वाटपाची ‘आॅन द स्पॉट’ चौकशी सुरू झाली. प्रत्येक शेतात जाऊन विहिरींची पडताळणी करण्यात आली. त्याबाबतचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. बाळापूर तालुक्यात सिंचन विहिरींसाठी ६४५ लक्ष्यांक असताना ९२४ लाभार्थींना मंजुरी आदेश देण्यात आला. पातूर तालुक्यातही तोच प्रकार घडला. अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी देणारे तत्कालीन गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले होते. चौकशी अहवालानंतर त्यामध्ये सहभाग असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतर या घोटाळ्यासाठी जबाबदार धरून तत्कालीन अधिकारी-कर्मचाºयांना १ ते ४ मुद्यांचे स्पष्टीकरण मागविणारे दोषारोपपत्र बजाविण्यात आले. हा घोळ कसा झाला, याची पडताळणी करण्याचा आदेश शासनाने दिला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र पथकांमार्फत या विहिरींच्या चौकशीचा अहवाल मागविला. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर जबाबदारी देण्यात आली. संबंधित अधिकाºयांनी प्रत्येक शेतात जाऊन विहिरींच्या सद्यस्थितीची माहिती घेत पडताळणी अहवाल तयार केला आहे. अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्याचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील मंजूर झालेल्या ४५५ विहिरींचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे आता या घोळाच्या प्रकरणाचा निर्णय शासन घेणार आहे. तर पातूर तालुक्यातील पडताळणी तातडीने पूर्ण करण्याचेही आयुक्तांनी बैठकीत बजावले.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूर