शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे ४५ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:39 IST

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.

ठळक मुद्देमागणीचा प्रस्ताव १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.निधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती.

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुषंगाने निधी मागणीचा प्रस्ताव १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना तीन हप्त्यात मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार मदत वाटपाचा पहिला व दुसरा हप्ता मिळून गत जून अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी ९० कोटी ३४ लाख रुपयांचा मदत निधी शासनामार्फत प्राप्त झाला. उपलब्ध मदत बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित तिसºया व अंतिम हप्त्यातील मदत जिल्ह्यातील उर्वरित बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करण्यासाठी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने बोडअळीग्रस्त शेतकºयांना मदत वाटपासाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.मदतीची शेतकºयांना प्रतीक्षा!जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांची मागणी असून, त्यापैकी मदत वाटपाच्या पहिल्या व दुसºया हप्त्यात शासनामार्फत ९० कोटी ३४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध मदत निधी जिल्ह्यातील संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला असून, उर्वरित तिसºया हप्त्याचा ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांचा मदत निधी केव्हा प्राप्त होणार आणि मदतीचा प्रत्यक्षात लाभ केव्हा मिळणार, याबाबत बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी