शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

 राज्यातील ४५ लाचखोरांची बडतर्फी नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:33 IST

४५ अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्याच विभागाने बडतर्फ न केल्याने हे लाचखोर शासनाच्या तिजोरीवर आजही डल्ला मारत असल्याची माहिती आहे.

- सचिन राऊत

अकोला : शासकीय कार्यालयात अडकलेले कामकाज करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. न्यायालयातही हे लाचखोर दोषी ठरले; मात्र त्यांच्याच विभागाने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत त्यांना बडतर्फच केले नसल्याचे वास्तव आहे. राज्यातील आठ विभागातील सुमारे ४५ अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्याच विभागाने बडतर्फ न केल्याने हे लाचखोर शासनाच्या तिजोरीवर आजही डल्ला मारत असल्याची माहिती आहे.राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात लाचखोरांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात येते. या लाचखोरांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर त्यांची अवैध संपत्ती, तसेच त्यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारी व अन्य प्रकरणांचा तपास करून लाचखोरांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामधील ४५ लाचखोरांना न्यायालयाने दोषी ठरवित शिक्षा सुनावली आहे; मात्र त्यानंतरही या ४५ लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात दिरंगाई केल्याचे वास्तव आहे. ग्रामविकास विभाग म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सर्वाधिक म्हणजेच १० अधिकारी व कर्मचाºयांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असतानाही या विभागाने या लाचखोरांना बडतर्फ केले नाही. यावरून त्यांचाच विभाग लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना पाठीशी घालत लाचखोरीचे समर्थन करीत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर महसूल, नोंदणी व भूमी अभिलेख या विभागातील ६ अधिकारी व कर्मचाºयांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावली आहे; मात्र त्यानंतरही संबंधित विभागाने या सहा लाचखोरांना बडतर्फ केले नाही. या पाठोपाठ पोलीस, कारागृह व होमगार्ड अशा पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर उद्या, ऊर्जा व एमआयडीसी या शासकीय कार्यालयातील पाच लाचखोरांना शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांना बडतर्फ केले नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. राज्याच्या आठही विभागातील लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांचा यामध्ये समावेश आहे. विभागनिहाय लाचखोरांची संख्यामुंबई ०३ठाणे ०४पुणे ००नाशिक ०८नागपूर १०अमरावती ०२औरंगाबाद ०५नांदेड १३-------------------एकूण ४५----------------------------------विभागातील अधिक लाचखोरजिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल, नगरविकास, उद्योग, ऊर्जा, एमआयडीसी, भूमी अभिलेख, पोलीस, कारागृह व होमगार्ड या विभागातील शिक्षा झालेल्या लाचखोरांचा सहभाग आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरण