शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

४४ गावांपर्यंत पोहोचले नाही टँकरद्वारे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:26 IST

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.

ठळक मुद्देटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर रोजी दिला. आठवडाभराच्या कालावधीत ६१ पैकी केवळ १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी उर्वरित पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना मात्र १५ सप्टेंबरपर्यंत टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याने टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे.

४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना पाच शासकीय आणि ४0 खासगी अशा एकूण ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला असला, तरी आठवडा उलटूनही केवळ १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांपर्यंत टँकरद्वारे पाणी शुक्रवारपर्यंंत पोहोचले नसल्याची स्थिती आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६१ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत १७ टँॅकरद्वारे १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १६ सप्टेंबरपासून आणखी पाच गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.- राजेश्‍वर हांडे,तहसीलदार, अकोला.