शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील विकास कामांचे ४१.८१ कोटी शासनाकडे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 14:04 IST

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १३९ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत अद्याप जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला नाही.

- संतोष येलकर अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १३९ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत अद्याप जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला नाही. ‘मार्च एन्डिंग’ तोंडावर असताना, शासनाकडे निधी अडकल्याने मंजूर निधीतील विकास कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) १३९ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीपैकी ९७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीपैकी ८४ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी विविध यंत्रणांना विकास कामांसाठी वितरित करण्यात आला आहे. मंजूर निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत अद्याप जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त झाला नाही. शासनाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने, विकास कामांसाठी संबंधित यंत्रणांना निधी वितरणाची प्रक्रिया रखडली आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दीड महिन्याचा कालावधी उरला असताना, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शासनाकडून ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणे प्रलंबित असल्याने, निधी केव्हा उपलब्ध होणार आणि उपलब्ध होणाऱ्या निधीतून जिल्ह्यातील विकास कामे मार्च अखेरपर्यंत मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे असे आहे वास्तव!

  • -मंजूर निधी : १३९ कोटी ५१ लाख रुपये.
  • - प्राप्त निधी : ९७ कोटी ९७ लाख रुपये.
  • -वितरित निधी : ८४ कोटी ४९ लाख रुपये.
  • -प्रलंबित निधी : ४१ कोटी ८१ लाख रुपये.

 

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अंतर्गत २०१८-१९ या वर्षातील मंजूर निधीपैकी ४१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी लवकरच शासनाकडून प्राप्त होणार आहे.-ज्ञानेश्वर आंबेकर,जिल्हा नियोजन अधिकारी.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना