शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १६९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये हिंगणा रोड येथील पाच, गोरक्षण रोड येथील चार, पिंपळे नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जठारपेठ, खडकी, केशव नगर, बलवंत कॉलनी, राम नगर, मलकापूर, खदान, माऊन्ट कारमेल स्कूल व लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
रॅपिड चाचण्यांमध्ये १३ पॉझिटिव्ह
सोमवारी दिवसभरात झालेल्या ११८ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १३ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत झालेल्या एकूण २९,६४८ चाचण्यांमध्ये १९५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
२१ जणांना डिस्चार्ज
सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ११ अशा एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४६५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,६१७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,८४२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४६५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.