शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

२६ हजार विद्यार्थी देणार आॅनलाइन कलमापन चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:23 IST

अकोला : राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व प्रशिक्षण परिषद व श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढावी, गुणवत्ता उंचवावी ...

अकोला: राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व प्रशिक्षण परिषद व श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने दहावीच्या निकालाची टक्केवारी वाढावी, गुणवत्ता उंचवावी आणि विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, हे कळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील फेब्रुवारी-मार्च २0२0 च्या दहावीची परीक्षा बसणाऱ्या २६ हजार विद्यार्थ्यांची मोबाइल अ‍ॅपद्वारे आॅनलाइन कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे. २७ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेण्यात येणार असून, पालक व विद्यार्थ्यांनी कलमापन चाचणीला गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले आहे.गतवर्षीपासून अकोला जिल्ह्यातील इयत्ता दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी कलमापन चाचणी घेण्यात येत आहे. या कलमापन चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढावी आणि गुणवत्ता उंचवावी, हा उद्देश आहे. गतवेळी चाचणीला शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा कलमापन चाचणी घेण्याच्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे अधिव्याख्याता, समुपदेशक नियोजन करीत आहेत. कलमापन चाचणीचे नियोजन करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी भारत स्काउट गाइड कार्यालयात शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वच शाळांमधील इयत्ता दहावीत शिकणाºया विद्यार्थ्यांची मोबाइलवरून आॅनलाइन कलमापन चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून नीता जाधव (बिडवे) आहेत तर प्रत्येक तालुक्यात दोन समन्वयक असे १४ समन्वयक नेमण्यात आले आहेत. कृषी, ललित, कला, वाणिज्य, तांत्रिक, गणवेशधारी सेवा, आरोग्य विज्ञान असे सात क्षेत्र आणि चार अभिक्षमता यावर आधारित ही चाचणी घेण्यात येईल. त्यात १४0 विधाने राहतील. या चाचणीतून विद्यार्थ्यांचा कल दिसून येणार आहे. त्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर घडवावे, हे यातून स्पष्ट होणार आहे. कलमापन चाचणी देणाºया विद्यार्थ्यांना ‘डाएट’च्या समुपदेशन केंद्राकडून करिअरविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.कलमापन चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे. विद्यार्थ्यांच्या कलानुसार विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाते. त्यांचा कल पाहून विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केल्या जाते. त्यामुळे चुकीचे करिअर क्षेत्र निवडण्यापासून विद्यार्थी व पालक सावध होतात.-नीता जाधव (बिडवे), जिल्हा समुपदेशककल व अभिक्षमता चाचणी

टॅग्स :Studentविद्यार्थीAkolaअकोला