शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास योजनेसाठी ४०० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 13:44 IST

अकोला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे केंद्रासह राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.

ठळक मुद्दे केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी दिला असून, १६० कोटींची रक्कम राज्य शासनाने जमा केली आहे.केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उभारून दिली जाणार आहेत. राज्य शासनाने १४० कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला असून, तो वितरीत करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.

अकोला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे केंद्रासह राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. महापालिक ांच्या स्तरावर ही योजना तातडीने निकाली काढण्याचे प्रयत्न होत असतानाच ग्रामीण भागात योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ४०० कोटींचा निधी वितरीत केला आहे. यामध्ये केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी दिला असून, १६० कोटींची रक्कम राज्य शासनाने जमा केली आहे.केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे उभारून दिली जाणार आहेत. ग्राम विकास विभागाच्या निर्देशानुसार स्वायत्त संस्थांनी ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांचा सर्व्हे करण्यासाठी तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली. सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांनी योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करीत केंद्र व राज्य शासनाकडे सादर केला. योजनेंतर्गत योजनेच्या पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थींना ३२२ चौरस फुटाचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख रुपये तर राज्य शासनाकडून १ लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. त्या व्यतिरिक्त बँकेमार्फत सव्वा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल; मात्र ३२२ चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम करायचे असल्यास तशी परवानगी दिली जात नसल्यामुळे नागरिकांची कोंडी झाली आहे. ‘पीएम’आवास योजनेंतर्गत घरांच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर विविध अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब ध्यानात घेता स्वायत्त संस्थांच्या स्तरावर सुधारित ‘डीपीआर’तयार केले जात आहेत. तीन टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या योजनेची व्याप्ती लक्षात घेता शासनाची स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर करडी नजर आहे. केंद्र व राज्य शासनासमोर २०२२ पर्यंत योजना निकाली काढण्याचे उद्दिष्ट असून, त्यानुषंगाने केंद्र शासनाने २४० कोटींचा निधी राज्य शासनाकडे वर्ग केला आहे.राज्य शासनाकडून १४० कोटी जमापंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारल्या जाणाºया घरांसाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के निधीची रक्कम वितरीत केली जात आहे. उर्वरित ४० टक्के रक्कम राज्य शासनाने जमा करणे भाग आहे. केंद्राकडून प्राप्त २४० कोटींच्या निधीत राज्य शासनाने १४० कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला असून, तो वितरीत करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना