शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

४0 लाखांच्या गुटख्याचा मालक सापडेना!

By admin | Updated: June 4, 2016 02:23 IST

कारवाईनंतर तीन दिवसांचा कालावधी उलटला!

अकोला: महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ४ मधील एका गोदामातून जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने जप्त केलेल्या ४0 लाखांच्या गुटखा साठय़ाचा मालक कारवाईच्या तीन दिवसांनंतरही सापडलेला नाही. गोदामाचे मालक पंकज राऊत आहेत; मात्र त्यांनी हे गोदाम कुणाला भाड्याने दिले होते आणि त्यामध्ये गुटख्याचा साठा कुणी ठेवला, याचा शोध घेण्यास पोलीस व अन्न आणि औषध प्रशासन विभागाला वेळ मिळत नसल्याने चित्र असून, या प्रकरणात त्यांची भूमीका संशयास्पद असल्याची चर्चा आहे.एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मध्ये पंकज राऊत नामक इसमाचे गोदाम असून या गोदामातून जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सचिन जाधव यांच्या पथकाने या बंद गोदामावर छापा टाकून सुमारे ४0 लाख रुपयांचा प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला आहे. मंगळवारी पंकज राऊतच्या गोदामातील गुटखा साठा जप्त केला; मात्र शुक्रवारपर्यंतही पोलिसांनी हा गुटखा कुणाच्या मालकीचा आहे, याचा शोध घेतलेला नाही. एरव्ही किरकोळ कारणावरून मोठी कारवाई असल्याचे भासविणार्‍या पोलिसांना ४0 लाख रुपयांचा गुटखा साठा कुणाचा आहे, याचा शोध घेण्यात रस नसल्याचे दिसून येत आहे. गुटखा माफियांक डून पोलिसांना मोठय़ा प्रमाणात हप्ता पोहोचविण्यात येत असल्याने खाल्ल्या मिठाला जागत पोलीस दलातील काही अधिकारी व कर्मचारी गुटखा माफियांची पाठराखण करीत असल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंकज राऊतची कसून चौकशी केल्यास काही वेळताच गुटखा साठय़ाचा खरा मालक समोर येणार असल्याचे बोलल्या जात आहे; मात्र या गुटखा मालकाला पोलीस, अन्न व औषध प्रशासनातीलच काही अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिसांच्या नाकाखाली एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुटख्याची उलाढाल सुरू असताना पोलीस काय करीत आहे, असा सवाल विशेष पथकाच्या कारवाईनंतर समोर आला आहे.