शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात ३९ टक्केच जलसाठा;  बुलडाणा जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्प शून्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:31 IST

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश धरणात अल्प जलसाठा उपलब्ध असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरणांची जलपातळी शून्य टक्केच आहे.

ठळक मुद्दे काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३६.४२ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला.यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९५.५८, अरुणावती ३४.६४, तर बेंबळा धरणात ४२.६६ टक्केच जलसाठा आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील बहुतांश धरण अल्प जलसाठा उपलब्ध असून, बुलडाणा जिल्ह्यातील चार धरण जलपातळी शून्य टक्केच आहे. पाच जिल्ह्यांत आजमितीस ३९.९१ टक्केच जलसाठा उपलब्ध झाला. पावसाचे दोन महिने संपल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २४ मध्यम, तर ४५२ लघू प्रकल्प आहेत. यात अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात आता कुठे ३६.४२ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात ३८.८९ टक्के जलसाठा झाला आहे. उमा ३०.५७, मोर्णा धरणात २१.८३ टक्के, तर वाण धरणात आतापर्यंत ५६.०० टक्के जलसाठा संकलित झाला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा संपला असून, या धरणाची पातळी शून्य टक्केच आहे. याच जिल्ह्यातील मस व कोराडी मध्यम धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा धरणात केवळ ८.३७, तर उतावळी धरणातील पातळी १७.२३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.३४ टक्के, पेनटाकळी धरणात ४.५४ टक्केच आहे. या धरणात एक थेंबही वाढ झाली नाही. ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १६.९२ टक्के, पलढगमध्ये १२.६५ टक्के, मन धरणात १५.९४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ६१.२८ टक्के, एकबुर्जी धरणात ९४.५७ टक्के, तर सोनल धरणात ४४.०३ टक्के जलसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात ४५.६२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९५.५८, अरुणावती ३४.६४, तर बेंबळा धरणात ४२.६६ टक्केच जलसाठा आहे.

मोठ्या धरणात ४०.८० टक्के जलसाठापश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत नऊ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात आजमितीस ४०.८० टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्प २४ असून, त्यामध्ये ४२.०९ टक्के, तर ४६६ लघू प्रकल्पात ३७.३२ असा एकूण ३९.९१ टक्के जलसाठा आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरण