शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

शहर विकासासाठी ३८ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 02:04 IST

अकोला मनपाच्या प्रशासकीय इमारतीचा समावेश; गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर यांचा पाठपुरावा.

अकोला: शहराच्या सर्वांगीण विकास कामांसाठी राज्य शासनाने ३८ कोटींच्या निधीला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मंजुरी दिली. आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी मंजूर केला. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे.केंद्रासह राज्यात व महापालिकेतदेखील सत्तापरिवर्तन झाल्यापासून अकोला शहराच्या विकासासाठी शासनाकडून निधीचा ओघ सुरूच आहे. शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्तीसाठी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे २0 कोटींचा पाठपुरावा केला होता.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाठवलेल्या रस्ते विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देत अर्थमंत्र्यांनी यापूर्वीच २0 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे पाठवले आहेत. यादरम्यान, अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात प्रशस्त रस्त्यांची गरज लक्षात घेता आ. शर्मा यांनी दहा कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्याच धर्तीवर अकोला पूर्व मतदारसंघातील विकास कामांसाठी आ. रणधीर सावरकर यांनीदेखील दहा कोटींचा प्रस्ताव सादर केला. तसेच महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी दहा कोटींची मागणी मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही लोकप्रतिनिधींच्या मागणीवर शिक्कामोर्तब करीत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी ३0 कोटींच्या निधीला मंजुरी दिली.