मूर्तिजापूर : रेल्वे स्टेशन परिसरातील खंबा नंबर ६२१/२८-३० गोरक्षण जवळ सिंधी कॅम्प येथील रहिवासी गोपाल विष्णु सरकटे याचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली. सिंधी कॅम्प गुरुनानक नगर येथे राहणारा गोपाल विष्णू सरकटे (३७) हा मानसिक रुण होता तो रात्रीपासून घरुन गायब होता अखेर त्याचा मृतदेह मुख्य रेल्वे डाऊन रुळावर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने रेल्वे पोलीसांसह घटनास्थळी धाव घेवून मृतदेह येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र जळमकर, पोलीस शिपाई जयकुमार तायडे करीत आहेत
रेल्वेखाली चिरडून ३७ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 11:53 IST