शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांकडून कर्ज घेतलेल्या ३८ हजार शेतकऱ्यांना ३७ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:33 IST

अकोला जिल्ह्यात ३८ हजार शेतकºयांना लाभ मिळणार असून, सुमारे ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.

अकोला: राज्य मंत्रिमंडळाने १० एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक शेतकºयांकडून घेतलेल्या कर्जात माफी देण्यात आली होती. यानुसार अकोला जिल्ह्यात ३८ हजार शेतकºयांना लाभ मिळणार असून, सुमारे ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.कर्जमाफी योजनेमध्ये परवानाधारक सावकाराने परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर येईल व्यक्तीस दिलेले कर्ज या योजनेस पात्र असणार नाही, अशी अट असल्यामुळे अकोला जिल्ह्यात एकूण पात्र शेतकरी ४९ होते तसेच त्यांचे रुपये ३ लाख ९६ हजार एवढेच कर्ज माफीस पात्र ठरले होते, तसेच ३८ हजार ५७० शेतकरी व त्यांनी घेतलेल्या ३७ कोटी रुपयांच्या कर्जमाफीस पात्र होऊ शकले नव्हते. या पृष्ठभूमीवर सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकºयांना दिलेली कर्जे माफ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार शेतकºयांना लाभ मिळणार असून, सुमारे ३७ कोटी रुपयाचे कर्ज माफ होणार आहे.

३८ हजार शेतकºयांना  लाभअकोला जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकºयांना या सावकारी कर्जमाफीचा लाभ घेता न आल्यामुळे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. तत्कालीन १९६ सावकारांनी जिल्ह्यामध्ये वाटप केलेल्या बहुसंख्य प्रकरणात वाटप करण्यात आलेले लाभार्थी हे सावकारी परवान्यावरील नोंद केलेल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील होते, त्यामुळेच या सावकारी कर्जमाफीचा लाभ अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना मिळू शकला नव्हता. याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला या कार्यालयामार्फत शासनास अहवालसुद्धा सादर करण्यात आला होता. आजच्या निर्णयामुळे या जिल्ह्यातील ३४२ गावातील ३८ हजार शेतकºयांना ३७ कोटी रुपये सावकारी कर्जातून मुक्ती मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी