शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची मालमत्ता कर वसुली ३६ टक्केच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 13:40 IST

अकोला: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला, तरी अजून महापालिकेच्या कर वसुलीची आकडेवारी अद्याप पुढे सरकलेली नाही. ६ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर ३५.६७ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकले.

अकोला: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असला, तरी अजून महापालिकेच्या कर वसुलीची आकडेवारी अद्याप पुढे सरकलेली नाही. ६ मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कर ३५.६७ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकले. मार्च महिन्याच्या शेवटच्या चरणात ही आकडेवारी कितीचा आकडा पूर्ण करते, याकडे आयुक्तांसह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे. ही आकडेवारी वाढावी म्हणून महापालिकेच्यावतीने विशेष मोहीम सुरू केली गेली आहे. मालमत्ता थकबाकीदारांना शास्ती माफ करण्यात आली असून, सुटीच्या दिवशीदेखील महापालिकेचा कर भरणा कक्ष नियमित सुरू ठेवण्यात आला आहे.महापालिकेला मागील आणि चालू असे एकूण १०३७७२५३०५ रुपये घेणे होते. यापैकी ३७०१५८४६४ रुपयांची वसुली महापालिकेच्या कर वसुली विभागाने केली आहे. आता महापालिकेला मार्च अखेरपर्यंत ६६७५६६८४१ ही रक्कम गोळा करायची आहे. या आकडेवारीनुसार केवळ ३५.६७ टक्के वसुली करण्यात कर विभागाला यश आले आहे. अकोला महापालिकेच्या चार झोननिहाय आकडेवारीनुसार हिशेब लावल्यास अकोला पूर्वची वसुली टक्केवारी सर्वात जास्त आहे. पूर्व झोनने ५१.४७ टक्के थकीत मालमत्ता कर वसूल केला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण झोनचा क्रमांक लागतो. येथे ३४.६३ टक्के कर वसुली झाली आहे. पश्चिम झोनची वसुली केवळ २७.०३ टक्के असून, उत्तर झोनची वसुली २६.६३ टक्के एवढी आहे. मार्च महिन्यातील उर्वरित दिवसांत मनपा कर विभाग आणखी पाच टक्के वसुलीचा आकडा फुगवू शकणार आहे. तरीदेखील ६० टक्के थकबाकी अकोलेकरांवर कायम राहते. ३१ मार्चपर्यंत शास्ती माफज्या अकोलेकरांकडे मागील मालमत्ता कर थकीत आहे, त्यांना ३१ मार्चच्या विशेष वसुली मोहिमेदरम्यान शास्ती माफ करण्यात आले आहे. शास्तीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अकोलेकरांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आवाहनात्मक सादला अकोलेकर किती प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाTaxकर