शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्यात ३.५ हजारांवर युवक-युवतींना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 13:47 IST

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली.

ठळक मुद्देअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींना नोकरीचे पत्र प्रदान करण्यात आले.रोजगार मेळाव्यासाठी पश्चिम विदर्भातून दहा हजारांवर युवक-युवतींनी नोंदणी केली होती. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती संपेपर्यंत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लरातो वाणिज्य महाविद्यालयात थांबून होते.

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली. रोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील ४६ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेऊन योग्य उमेदवारांची निवड करून त्यांना नोकरीचे पत्र दिले.दुपारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते मुलाखतीद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींना नोकरीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी महापौर उज्ज्वला देशमुख, अशोक ओळंबे, जि.प. सदस्य अक्षय लहाने, ज्येष्ठ नगरसेवक हरीश आलिमचंदानी, नगरसेवक आशिष पवित्रकार, गोपी ठाकरे, रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, संजय तिकांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता यांनी रोजगार मेळाव्यांची सध्या गरज आहे. यातूनच युवकांना रोजगार मिळतो, त्यामुळे सातत्याने रोजगार मेळावे आयोजित केल्या जातील. कंपनी आणि रोजगार इच्छुकांमध्ये आम्ही दुवा म्हणून काम करू. विदर्भातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या साक्षी गायधनी हिचा सत्कार करण्यात आला.रोजगार मेळाव्यासाठी पश्चिम विदर्भातून दहा हजारांवर युवक-युवतींनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या हजारो युवक-युवतींची लरातो वाणिज्य महाविद्यालय, रालतो विज्ञान महाविद्यालय आणि सीताबाई कला महाविद्यालयांमध्ये नामांकित कंपनींच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या ३ हजार ५११ उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली. सकाळी ९ वाजतापासून रोजगार इच्छुक युवक-युवतींनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती संपेपर्यंत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील लरातो वाणिज्य महाविद्यालयात थांबून होते.अर्थमंत्री मुनगंटीवारांनी दिले नोकरीचे पत्र!अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मनीषा अशोक इकडे (पुणे येथील कंपनी) मुकेश भीमराव थाटे (बारामती येथील कंपनी), शुभम समदुर (फियाट इंडिया पुणे), गजानन राठोड (मॅग्मा लि. पुणे), गणेश सपकाळ (फियाट इंडिया पुणे), अमित बोपटे, अजय उमाळे(मॅग्मा लि. पुणे) यांना नोकरीचे पत्र देण्यात आले.

१२ हजार लोकांची जेवणाची व्यवस्थारोजगार मेळाव्यामध्ये पश्चिम विदर्भातून आलेल्या १0 हजारांवर उमेदवार व इतर लोकांसाठी ज्येष्ठ नगसेवक हरीश आलिमचंदानी यांनी खिचडीची व्यवस्था लरातो वाणिज्य महाविद्यालय परिसरात केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार