शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यालाही जिल्ह्यातील ३.३१ लाख गरीब कुटुंबांना मिळाला नाही ‘आनंदाचा शिधा’!

By संतोष येलकर | Updated: March 23, 2023 19:20 IST

पुरवठादारांकडून शिधा जिन्नसांचा पुरवठा होणार तरी कधी?

संतोष येलकर -अकोला: गुढीपाडवा आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरीब रेशनकार्डधारक कुटुंबांना रेशन दुकांनांमधून ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार असल्याचे शासनामार्फत गेल्या महिन्यात घोषित करण्यात आले; मात्र गुढीपाडवा होऊन गेला, तरी जिल्ह्यातील ३ लाख ३१ हजार ३५७ गरीब रेशनकार्डधारक कुटुंबांना अद्याप ‘आनंदाचा शिधा’ मिळाला नाही. यामुळे रेशनकार्डधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यासाठी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या पुरवठादारांकडून शिधा जिन्नसांचा पुरवठा होणार तरी कधी? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अंत्योदय अन्न योजनेतील रेशनकार्डधारकांसह प्राधन्य कुटुंब आणि एपीएल शेतकरी इत्यादी गरीब रेशनकार्डधारक कुटुबांना गुढीपाडवा आणि महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १०० रुपयांत प्रतिकुटुंब एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल इत्यादी शिधा जिन्नसांचा ‘आनंदाचा शिधा’ रेशन दुकानांमधून दिला जाणार असल्याचे शासनामार्फत गेल्या महिन्यात घोषित करण्यात आले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पात्र गरीब रेशनकार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यासाठी रवा, डाळ, साखर व पामतेल इत्यादी शिधा जिन्नसांची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या १ मार्च रोजी शासनाच्या पुरवठा विभागाकडे नोंदविण्यात आली; परंतु शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून संबंधित शिधा जिन्नसांचा पुरवठा अद्यापही जिल्ह्यात करण्यात आला नाही. त्यामुळे गुढीपाडवा होऊन गेला तरी २३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ३१ हजार ३५७ गरीब रेशनकार्डधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ मिळाला नाही. त्याअनुषंगाने मागणीप्रमाणे पुरवठादाराकडून रवा, डाळ, साखर व पामतेल इत्यादी शिधा जिन्नसांचा पुरवठा जिल्ह्यात होणार तरी कधी आणि रेशन दुकानांमधून जिल्ह्यातील गरीब लाभार्थी कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

लाभार्थी कुटुंबांची अशी

आहे तालुकानिहाय संख्या!तालुका             कुटुंबे

अकोला ग्रामीण ६४,३४०अकोला शहर ४१,४४२

अकोट             ४५,१२०बाळापूर             ४०,२१७

बार्शी टाकळी            ३६,२०४मूर्तिजापूर             ४१,४०१

पातूर             २९,६७९तेल्हारा             ३८,००० 

टॅग्स :AkolaअकोलाState Governmentराज्य सरकार