शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

७० रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल ३०२२ ‘फुकटे’; विनातिकीट प्रवाशांकडून १७ लाखांचा दंड वसूल

By atul.jaiswal | Updated: March 15, 2023 18:26 IST

एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या ३,०२२ प्रवाशांवर कारवाई करत १७ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अकोला - विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्यांना जरब बसावी या हेतूने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने बुधवारी विभागातील अकोला रेल्वेस्थानकासह सात मोठे रेल्वेस्थानक व अप आणि डाऊन मार्गावरील ७० रेल्वे गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या ३,०२२ प्रवाशांवर कारवाई करत १७ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांच्या नेतृत्वात मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव सेक्शनमध्ये वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस आणि आरपीएफचे संयुक्त पथक तयार करून सुमारे ७० गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, भुसावळ, खांडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तीन अधिकारी, तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य कर्मचारी व आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या ४२ चमूंनी सहकार्य केले.

रेल्वेत प्रवास करताना योग्य ते तिकीट घेऊन ज्या श्रेणीचे तिकीट आहे त्याच श्रेणीच्या डब्यात प्रवास केला पाहिजे. तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास नको असेल तर प्रवाशांनी युटीएस ॲपचा वापर करावा.- शिवराज मानसपुरे, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे