शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

३ लाख ११ हजारावर मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 15:14 IST

अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील एकूण ३ लाख ११ हजार ४२४ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१० आॅगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य खात्याच्यावतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.या दिवशी शाळेत गैरहजर असलेल्या मुलांसाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी ‘मॉपअप’ फेरी दरम्यान जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल.

अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील एकूण ३ लाख ११ हजार ४२४ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतांपासून धोका आहे. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव, हे याचे प्रमुख कारण आहे. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमी दोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय त्यामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. ‘एनएफएचएस’च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या पाच वर्षांखालील बालकांची टक्केवारी ३४.४ टक्के आहे, तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३० किशोरवयीन मुलांमध्ये, तर ५६ टक्के मुलींमध्ये रक्तक्षय आढळून येतो. जंतामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि रक्तक्षयाचे आजार बळावत आहेत. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेदरम्यान १० आॅगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य खात्याच्यावतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी अंगणवाडी कर्मचारी, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.१६ आॅगस्टला ‘मॉपअप’ फेरीजिल्ह्यातील ग्रामीण भागात १० आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे नियोजन आहे. तसेच या दिवशी शाळेत गैरहजर असलेल्या मुलांसाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी ‘मॉपअप’ फेरी दरम्यान जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग, शाळा, महाविद्यालयांशी समन्वय साधून पूर्वतयारी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद