शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कामांच्या देयकांसाठी २.८६ कोटी

By admin | Updated: August 29, 2014 01:43 IST

अकोला जिल्ह्यातील थकीत देयके होणार अदा.

अकोला : पाणीटंचाई निवारणासाठी गेल्या उन्हाळ्यात जिल्ह्यात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी २ कोटी ८६ लाखांचा निधी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. या निधीतून पाणीटंचाई निवारणाच्या कामांची प्रलंबित देयके अदा करण्यात येणार आहेत.पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गेल्या जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अखेरपर्यंंत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांची देयके थकीत होती. त्यामध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची १ कोटी १७ लाख आणि एप्रिल ते जून या कालावधीत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचे १ कोटी ६९ लाख, असे एकूण २ कोटी ८६ लाखांची देयके प्रलंबित होती. पाणीटंचाई निवारण उपाययोजनांच्या कामांची थकीत असलेली देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी अखेर शासनामार्फत जिल्ह्यासाठी २ कोटी ८६ लाखांचा निधी प्राप्त झाला. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला हा निधी उपलब्ध झाला. निधी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला वितरित करण्यात येणार आहे.