शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘नरेगा’ची २७ हजार कामे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 10:35 IST

या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत.

- संतोष येलकर

अकोला : पावसाळ्याचे दिवस आणि शेतीची कामे सुरू असली तरी, कोरोना संकटाच्या परिस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) राज्यात सद्यस्थितीत २७ हजार ६८९ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची कामे करण्यात येतात. पावसाळ्यात आणि शेतीची कामे सुरू असल्यास नरेगा अंतर्गत सार्वजनिक कामे बंद असतात आणि वैयक्तिक लाभाची कामे केली जातात. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाची कामे सद्यस्थितीत केली जात आहेत. १८ सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार ‘नरेगा’ अंतर्गत राज्यभरात २७ हजार ६७९ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेतीची कामे सुरू असली तरी, कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘नरेगा’ कामावर मजुरांची लक्षणीय उपस्थिती असल्याचे दिसून येत आहे.सुरू असलेली अशी आहेत वैयक्तिक लाभाची कामे!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गुरांचे गोठे, नाडेप, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, रोपवाटिका, घरकुल, शौचालय इत्यादी वैयक्तिक लाभाची कामे सुरू आहेत.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात सध्या २७ हजार ६८९ कामे सुरू असून, या कामांवर १ लाख ४० हजार ७९२ मजूर काम करीत आहेत. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मागणी येताच मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.- ए.एस.आर. नायकराज्य आयुक्त, मनरेगा

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना